SA20 Final 2025: मुंबई इंडियन्सने जिंकली आणखी एक ट्रॉफी; दक्षिण अफ्रिका T20 स्पर्धेत पटकावलं पहिलं विजेतेपद
SA20 Final 2025 MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape: दक्षिण अफ्रिका टी-20 2025 च्या अंतिम सामन्यात MI केप टाऊन संघानं बाजी मारली.

SA20 Final 2025 MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape: मुंबई इंडियन्सने आणखी एक ट्रॉफी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दक्षिण अफ्रिका टी-20 2025 च्या अंतिम सामन्यात MI केप टाऊन संघानं बाजी मारली. MI केप टाऊनने सनरायझर्स ईस्टर्न केपचा पराभव करून विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने आयपीएल, यूएस T20 आणि दुबई T20 लीगनंतर जिंकली चौथी T20 लीग जिंकली आहे.
MI won the T20 league in India.
— Johns. (@CricCrazyJohns) February 8, 2025
MI won the T20 league in America.
MI won the T20 league in Dubai.
MI won the T20 league in South Africa.
THE RULERS IN T20 LEAGUE - MI FAMILY 💙 pic.twitter.com/V9d35hy0zx
SA20 च्या अंतिम सामन्यात, MI केपटाऊनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. कॉनर एस्टरहुइझेनने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कॉनर एस्टरहुइझेनने 26 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.
THE MOST SUCCESSFUL OWNER IN T20 FRANCHISE HISTORY - AKASH AMBANI 👑 pic.twitter.com/It7Ehjsbaq
— Johns. (@CricCrazyJohns) February 8, 2025
MI केपटाऊनने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स ईस्टर्न केप मैदानात उतरले आणि 18.4 षटकांत 105 धावांवर सर्व खेळाडू बाद झाले. सनरायझर्सची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅम (05) च्या रूपात संघाला पहिला धक्का बसला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉर्डन हरमन (01) च्या रूपात संघाने आपला दुसरा बळी गमावला. यानंतर संघाने झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे 18.4 षटकांत सनरायझर्स ईस्टर्न केप संघाला केवळ 105 धावा करता आल्या आणि MI केप टाऊन अंतिम सामना 76 धावांनी जिंकला.
2023 - Last position. ⬇️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 8, 2025
2024 - Last position. ⬇️
2025 - CHAMPIONS. 🏆
- CAPTAIN RASHID KHAN HAS DONE IT FOR MI CAPE TOWN - SA20 CHAMPIONS 2025. 🙇♂️🏆 pic.twitter.com/PdaHBkBB9N




















