एक्स्प्लोर

Parbhani: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई, 3 पोलीस कर्मचारी निलंबित, आंदोलकांच्या 15 मागण्या काय?

सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.

Parbhani: परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूने राज्यभरात मोठे खळबळ उडाली होती .पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा (Somnath Suryavanshi) मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता .मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता .यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून ,  पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाल्याचे उघड आल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय .जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे . (Parbhani)

पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्र्वर तूरनर,कर्मचारी सतीश दैठणकर,मोहित पठाण,राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आले आहे .

नेमकी घटना काय?

परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.

आंदोलकांनी केल्या 15 मागण्या

परभणी ते मुंबई लाँग मार्च दरम्यान नाशिक येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकारी आंदोलकांना भेटले .त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे .आंदोलकांच्या भेटीनंतर 15 मागण्या मान्य करण्याबाबत  पत्र देण्यात आले आहे . आंदोलकांकडून मागण्या मान्य करण्याबाबत  देण्यात एक महिन्यांचा वेळ देण्यात आलाय . 

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?

1 . दत्ता सोपान पवार याची नार्को टेस्ट व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे .
2.आंदोलन करणारे तसेच सोमनाथ सूर्यवंशीला जीवे मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करणे
3 .आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे .
4 .बी आर आंबेडकर असे नाव असलेल्या मोटार सायकल फोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालासुद्धा निलंबित करून कारवाई करणे .
5 .गठीत केलेल्या न्यायालयीन चौकशीचे न्यायाधीश आम्हास मान्य नाही .
6 .आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकारी व जेलर यांच्यावर कारवाई करून निलंबित करणे
7.कलम 176 1 ( अ)सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी
8.परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही जप्त करून ते तपासावे .
9 .सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने एक कोटी रुपये आर्थिक मदत करावी .तसेच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांनाही मदत करून दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी .
10.आंबेडकर अनुयायांना मारहाण करणारे पोलीस कर्मचारी यांना निलंबित करून अनुयायांना शासनाने दहा लाख रुपयांची मदत करावी
11 .पोलिसांनी केलेल्या कोंबिंग कारवाई मध्ये जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करावी .
12.दोषी अधिकारी अंमलदारांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे
13.पोलिसांसोबत सामील होऊन आंबेडकरीत युवकांवर मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करून ॲट्रॉसिटी नुसार कारवाई करावी .
14 .सोमनाथ सूर्यवंशीचे स्मारक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा .
15. परभणीतील उपोषण मैदानाला लोकनेते विजय वाकोडे यांना समाजभूषण पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा .

हेही वाचा:

संतोष देशमुख प्रकरणात केज पोलीसांना सहआरोपी का केलं नाही? खासदार बजरंग साेनवणेंचा सवाल, म्हणाले..

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget