एक्स्प्लोर

Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक सुरू; आता शेतकऱ्यांना काही मिनिटांत मिळणार मदत

Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलिसांनी थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक (Helpline Number) सुरू केला आहे. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यात अवैध व्यवसाय (Illegal Business) बोकाळले असून काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik Rural Police) सातत्याने धडक कारवाई केली जात आहे. मात्र तरीदेखील अनेकजण छुप्या पद्धतीने मद्यविक्री किंवा इतर अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी थेट शेतकरी हेल्पलाईनचा (Helpline Number) पर्याय निवडला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनाची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. सदर कारवाईदरम्यान पोलीसांनी जिल्ह्यात दुर्गम ठिकाणी चालणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायांची ठिकाणे उध्वस्त केली आहेत. त्याचप्रमाणे अशा हातभट्ट्यांना कच्चामाल पुरवणाऱ्या पुरवठादारांवर देखील मोठ्या कारवाया केल्या आहेत. याच अवैध व्यवसायांचे विरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी यापूर्वी 6262 (76) 6363 ही 'खबर' हेल्पलाईन सुरू केली होती. सदर हेल्पलाईनचे माध्यमातून अनेक जागरूक नागरिकांनी आपापल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीसांना दिली होती. सदर हेल्पलाईनमुळे ग्रामीण पोलीसांना अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोठी मदत झाली होती.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनेक कामांसाठी पोलीस ठाण्यात आणि इतर कार्यालयामध्ये जावे लागते. बऱ्याचदा आपले काम नक्की कोणाकडे प्रलंबित आहे. याची माहिती देखील त्यांना मिळत नाही. परिणामी, त्यांना अकारण प्रवास खर्च सोसावा लागतो आणि त्यांचा बहुमूल्य वेळ देखील खर्च होतो. सदर बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीसांनी शेतकऱ्यांसाठी आता 6262 (76) 6363 ही नवीन 'बळीराजा' हेल्पलाईन सुरू केली आहे. आज रोजी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे हस्ते सदर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात आला. सदरवेळी मा. मंत्री महोदयांनी 'बळीराजा' हेल्पलाईनवर पहिला कॉल करून ते शेतकरी बोलत असल्याचे सांगितले, त्याचप्रमाणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन जिल्हयातील शेतक-यांच्या समस्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना व्यक्त करून सदर कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण हेल्पलाईन 

नाशिकसह जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना देखील वारंवार घडत असतात. अशावेळी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीस सामोरे जावे लागत असते. मात्र आता बळीराजा हेल्पलाइनच्या माध्यमातून चांगला पर्याय असणार आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून बळीराजाला फसवणुकीपासून परावृत्त करण्यासाठी हेल्पलाईन महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतक-यांच्या समस्या सोडवणुकीसाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध असून, शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारी सदर हेल्पलाईनचे माध्यमातून मोकळेपणाने मांडाव्यात असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik News : नाशिकमध्ये खासगी सावकारीचा फास, महिलांची सर्वाधिक पिळवणूक, नागरिकांना टोकाचं पाऊल का उचलावं लागतंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget