एक्स्प्लोर

Nashik Police : "हेल्मेट घाला, फोनवर बोलू नका"; नाशिककरांवर थेट कंट्रोल रुममधून पोलिसांचा वॉच, अशी काम करते यंत्रणा 

Nashik News : नाशिकच्या वाहतूक कोंडीवर (Nashik Traffic) पर्याय उपलब्ध झाला असून नाशिककरांना आता शिस्तीत वाहन चालवावे लागणार आहे. 

नाशिक : नाशिक शहरातील (Nashik) बेशिस्त वाहनचालकांवर वॉच ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांकडून सिग्नल रिमोट ऑपरेटिंग सिस्टिम (Signal CCTV) बसविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प अखेर कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असून नुकतीच त्याची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता नाशिकच्या वाहतूक कोंडीवर (Nashik Traffic) चांगला पर्याय उपलब्ध झाला असून नाशिककरांना आता शिस्तीत वाहन चालवावंं लागणार आहे. 

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी काही नवीन नाही, हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मागील सिहंस्थ कुंभमेळ्यापासून (Nashik Kumbhmela) शहरातील महत्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार होती. अखेर या सीसीटीव्ही यंत्रणेला मुहूर्त लागला असून आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणार आहे. सिग्नल नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटिव्हीद्वारे वॉच ठेवला जात आहे. नियम तोडणाऱ्या वाहनाच्या नंबरच्या आधारे रिमोट ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे संबंधित चालकांना ई-चलन दिले (E Challan) जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाकडून या सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात असून सिबीएस, सिग्नलसह मेहर शहरातील सर्व सिग्नलवर लवकरच ऑनलाईन दंड आकारणी सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील (Nashik City Police) कंट्रोल रूम मधून नाशिककरांवर वॉच ठेवला जात आहे. शहरातील विविध भागातील 40 जागांवर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, त्याचे फुटेज थेट कंट्रोल रूममध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे थेट सिग्नलवर बेशिस्तपणा करणाऱ्या नाशिककरांवर नजर ठेवली जात आहे. शिवाय ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून थेट सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनधारकांना सूचना देखील केल्या जाणार आहेत. याबाबत नुकतीच एक चाचणी घेण्यात आली. यात पोलीस संबंधित वाहनाचा नंबर पुकारत चालकाला नियम पाळण्याचा सल्ला देत असल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह लवकरच सीसीटीव्हीद्वारे ई-चलान अंतर्गत कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती आयुक्तालयाने दिली. 

असा आहे कंट्रोल रूम 

दरम्यान, उल्लंघन करणारे वाहन आता सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर संबंधित चालकाला सूचना दिल्या जातात. यात ट्रिपल सिट, सिट बेल्ट नसणे, हेल्मेट नसणे, सिग्नल सुरू असतांना पुढे जाणाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे. तर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या कंट्रोल रुममध्ये पोलिसांसाठी 6 बाय 4 फुटाची ‘एलसीडी वॉल’ लावण्यात आली. 16 डबल पॅनलचे मॉनिटर, सिग्नलच्या ‘सीसीटीव्ही’चे चित्रीकरण, ‘कमांड रूम’ व्हॉइस मोड, झेब्रा क्रॉसिंग, यू-टर्न घेणाऱ्यांवर ‘ऑटोमॅटिक ई-चलान’ अशा सुविधा उपलब्ध रमुन देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत मेहेर, सीबीएस या सिग्नलवर ही कारवाई सुरू असून, पुढील काही दिवसांत सर्व सिग्नलवर ती राबविण्यात येणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत 800 कॅमे-यांची नाशिकवर नजर असेल. याचा फायदा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Traffic Police: नाशिकमध्ये सिग्नलवर कंट्रोल रूममधून थेट वाहनचालकांना मिळणार सूचना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget