Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न? फडणवीसांच्या आढावा बैठकीकडे पाठ, एकटेच जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी करणार
Eknath Shinde in Nashik: महायुती सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मधली दरी सध्या वाढत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधला अंतर वाढत चालल्याचं बोललं जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा आयोजनाची बैठक मुंबईमध्ये घेतली होती, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असताना देखील ते उपस्थित राहू शकले नाही. एकनाथ शिंदे यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे पसंत केले. आज एकनाथ शिंदे नाशिक मध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, त्यामुळे आज मंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत नाशिक मध्ये बैठक घेणं पसंत केलं आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अद्याप कायम आहे, त्यामुळे महायुती सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मधली दरी सध्या वाढत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकनाथ शिंदे नाशिकमध्ये घेणार कुंभमेळ्याचा आढावा
राज्यामध्ये माहितीचा सरकार आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अंतर वाढत चालला आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याची आढावा बैठक सह्याद्री वरती घेतली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निमंत्रित होते, एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री आहेत आणि या आढावा बैठकीमध्ये महानगरपालिकचे अधिकारी होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विभागाची आढावा बैठक होती. मात्र, या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी यांना टाळलेलं होतं. त्याचबरोबर ते मलंगडच्या कार्यक्रमाला पोहोचले. त्यानंतर आता दोन दिवसानंतर एकनाथ शिंदे नाशिक मध्ये जाऊन कुंभमेळ्याची आढावा बैठक घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहतात. त्यानंतर ते नाशिक मध्ये जाऊन आढावा बैठक घेतात. त्यामुळे दोघांमधल्या अंतर वाढत आहे का? असा प्रश्न समोर येत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशी चर्चा देखील आहे. नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये असलेल्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप कायम आहे, त्यावर ती निर्णय होऊ शकलेला नाही. या पदाबाबत ज्याप्रमाणे शिवसेना आग्रही आहे. त्याप्रमाणे भाजप देखील आग्रही आहे, अशातच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणं टाळणं. आणि स्वतः जाऊन आढावा बैठक घेणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळ बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्व बैठकींना एकनाथ शिंदे यांनी शंभर दिवसांचा आढावा घेताना देखील एकनाथ शिंदे यांच्या विभागाचा आढावा घेताना एकनाथ शिंदे गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री किंवा शिंदे उपस्थित का राहत नाहीत? त्यांची नाराजी अजूनही दूर झाली नाही का? असा प्रश्न देखील समोर येतं आहे. आज नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बैठकांना भाजपचे नेते भाजपचे मंत्री उपस्थित राहणार का? की फक्त शिवसेना नेते आणि आमदार उपस्थित राहणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
