Nagpur Railway Station : नागपूर रेल्वे स्टेशन - मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी नवा फूट ओव्हर ब्रिज; प्रकल्पाला मंजुरीची प्रतिक्षा
रेल्वे स्थानक ते मेट्रोपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे प्रवाशांना खाली उतरण्याशिवाय पर्याय नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नव्या एफओबीला मंजूरीची गरज आहे.
Nagpur Railway Station and Nagpur Metro News : नागपूर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नव्या एफओबीच्या (Foot Over Bridge) योजनेला मंजुरी मिळाल्यानंतरच रेल्वे भूविकास प्राधिकरणाची वतीने कामास सुरुवात होणार आहे. मात्र यासाठी काही दिवसपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील मेट्रो एफओबी कनेक्टिव्हिटीचा मुद्दा रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. त्यावेळी 40 मीटर लांबीच्या एफओबीची मागणी करण्यात आली. नागपूर रेल्वे स्थानक ते मेट्रोपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे प्रवाशांना खाली उतरण्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या घडीला नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास रेल्वे भूविकास प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे. जोपर्यंत नव्या एफओबीच्या योजनेला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत काम सुरु करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सल्लागार समितीची बैठकीत मागणी
प्रजापतीनगर ते लोकमान्य नगरपर्यंत धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठकीत मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत चालू वर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या विषयावर चर्चा झाली. नागपूर रेल्वे स्थानकाशिवाय इतर स्थानकांचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबतची पुढील प्रक्रियाही सुरु झाली आहे.
जबलपूर एक्स्प्रेसची वेळ बदलणार
अमरावती-नागपूर-जबलपूर एक्स्प्रेस (Ami Jbp Superfast Express 12159) नागपूर रेल्वे स्थानकावरुन 7.55 वाजता सुटते. यामुळे प्रवाशांची अडचण वाढली आहे. ही रेल्वे पूर्वी रात्री 9.45 वाजता सुटायची. वेळापत्रकातील हा बदल अनेकांसाठी गैरसोयींचा असल्याची तक्रार आल्यानंतर आता विभागीय व्यवस्थापनाने लक्ष घातले आहे. लवकरच या ट्रेनच्या वेळेत बदल करण्यात येईल. याशिवाय विभागांतर्गत गाड्यांचे थांबे, विविध प्रवासी सुविधांचा विस्तार, गाड्यांमधील वाढत्या चोरी आदी प्रश्नांवर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावल्या जाणार असल्याचे आश्वासन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांनी दिले.
धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले
नागपूर मार्गे येणे-जाणे करणाऱ्या तब्बल 33 रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला असून, या गाड्यांपैकी कोणती गाडी, एक तास, कोणती दोन तर कोणती गाडी चक्क सहा तास विलंबाने धावत आहे. रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने गाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशात प्रतीक्षालयात जागा कमी पडू लागल्याने अनेक प्रवासी रेल्वेस्थानकाच्या विविध फलाटावर, रेल्वेस्थानकाच्या परिसरात जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आढळत आहेत.
ही बातमी देखील वाचा...