एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : 'ह्या' नंबरवर मेसेज केल्यावर काय होतं?

पण या मेसेजचं सत्य काय आहे?

मुंबई : महिला सुरक्षेचा मुद्दा नेहमीच गंभीर समजला जातो. महिलांशी संबंधित गुन्हे पाहता याबाबत आज विविध प्रकारच्या मोबाईल अॅपपासून हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहेत. पण सध्या सोशल मीडियावर महिला सुरक्षेसंदर्भात एक विशेष मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये एक नंबर देऊन सांगितलं जातं की, महिला टॅक्सी किंवा रिक्षात प्रवास करत असतील तर त्यांनी तातडीने आपला मोबाईलनंबर संबंधित नंबरवर पाठवावा. या नंबरवर मेसेज करताच, महिला निश्चित स्थळी सुरक्षित पोहोचेपर्यंत त्या परिसरातील पोलिस त्यांच्यावर जीपीआरएसद्वारे देखरेख ठेवतात, असा दावा केला जातो. मागील काही काळापासून व्हायरल होणारा हा मेसेज खरा मानून अनेक महिला आणि विद्यार्थिनी त्यांची माहिती संबंधित नंबरवर (9969777888) शेअर करतात. पण या मेसेजचं सत्य काय आहे? व्हायरल सत्य : 'ह्या' नंबरवर मेसेज केल्यावर काय होतं? व्हायरल मेसेज पूर्णत: खोटा होय, हा मेसेज पूर्णत: खोटा आहे. या मेसेजबाबत अधिक छाननी केली असता हा फेक मेसेज असल्याचं समोर आलं आहे. या मोबाईल नंबरवरुन जीपीआरएसद्वारे देखरेख होत नाही. 9969777888 हा मोबाईल नंबर मुंबई पोलिसांचा असल्याचं मेसेजमध्ये सांगितलं आहे. परंतु मुंबई पोलिसांनी महिला सुरक्षेबाबत एका टेलिकॉम कंपनीसोबत मिळून हा हेल्पलाईन नंबर 2014 मध्ये सुरु केला होता. पण त्याचा गैरवापर करुन कोणीतरी या नंबरसोबत मेसेज करुन व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर केला. या नंबरवर मेसेज केल्यास काय होतं?  या नंबरवर मेसेज केल्यास 100 नंबर डायल करण्याचे सांगितलं जातं. त्यामुळे अशाप्रकारचा कोणताही नंबर सध्या उपलब्ध नाही. पोलिसांकडे अशी सिस्टम नाही! मात्र सोशल मीडियावर दरदिवशी अशाप्रकारचे खोटी माहिती असलेले मेसेज व्हायरल केले जातात. पण महिला सुरक्षेसारखा गंभीर विषय असल्याने अनेक जण हे मेसेज खरं असल्याचं समजून शेअर करतात. मात्र पोलिसांकडे अशी कोणतीही सिस्टम नाही की, ते संबंधित नंबरवर पाठवलेल्या मेसेजवरुन जीपीआरएसद्वारे महिलांवर देखरेख ठेवू शकतील. त्यामुळे हा व्हायरल मेसेज पूर्णत: चुकीचा आहे. महिलांसाठी एफआरआय अॅप दरम्यान, महिलांसाठी अनेक शहरांच्या पोलिसांकडून एफआयआर अॅपच्या रुपाने एक चांगली सुविधा उपलब्ध केली आहे. कोणतीही महिला किंवा विद्यार्थिनी हे अॅप तिच्या स्मार्टफोनमध्ये सहजरित्या आणि मोफत डाऊनलोड करुन वापरु शकते. आपत्कालीन परिस्थितीत अॅपमधील हेल्प बटणवर क्लिक करताच कंट्रोल रुममध्ये तुमच्या मोबाईलचं लोकेशन पोहोचतं. यानंतर दोन मिनिटांतच कंट्रोल रुममधून संबंधित महिलेला कॉल बॅक येतो. सोबतच जवळच्या पीसीआरलाही याबाबत सूचना दिली जाते. वुमन हेल्पलाईन 1091 आणि 100 हा दुसरा पर्याय सगळ्यांसाठीच उपलब्ध आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरीAmeya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशाराSpecial Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?Zero Hour | 'वक्फ' धर्माचा नाही तर संपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा, मग विधेयकाला विरोध का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
पौराणिक काळात हनुमान तर आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श : मोहन भागवत
IPL RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
RCB vs GT आधी स्टेडियम बाहेर सिक्स, मग दांडी उद्ध्वस्त, सिराजच्या ओवरमध्ये ड्रामा VIDEO
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
कुर्ला स्टेशनवरील लोकल ट्रेनमधून धूर, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांची धावाधाव; वाहतुकीचा खोळंबा
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
आता गरिबाचा घास नाही... सोन्याच्या दराची उंचच उंच गुढी; पाडव्यानंतर मार्केट हललं, सोनं 1 लाखांवर जाणार?
Rain Alert Today:राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
राज्याच्या दक्षिणेकडे तीव्र वादळी वारे, गारपीटीचा अंदाज, संपूर्ण राज्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
ग्राहकांना शॉक! लाईट बिल कमी येणार नाहीच; वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती
Beed News : मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
मुख्यमंत्र्यांचा संदेश अन् अभिमन्यू पवारांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची भेट
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
अंबानींचं घर हे वक्फच्या जमिनीवर; आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा, मंदिरांमधील सोन्याबाबतही स्पष्टच बोलले
Embed widget