एक्स्प्लोर
फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर तातडीने कारवाई करा: पोलीस महासंचालक

मुंबई : बिल्डरांकडून होणाऱ्या वाढत्या फसणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचं बांधकाम व्यावसायिकांवर लक्ष राहणार आहे.
बांधकाम व्यावसायिकांकडून होणाऱ्या फसवणुकीचं प्रकार वाढलं आहे. त्याची गंभीर दखल घेऊन तातडीनं कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिकांची अनियमित कामे आणि ग्राहकांच्या फसवणुकीसंदर्भात मोठय़ा प्रमाणावर तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध तक्रारी आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
