एक्स्प्लोर

हायवेच्या निर्मितीमध्येही तुम्ही करु शकता गुंतवणूक, नितीन गडकरींची घोषणा 

Nitin Gadkari : आता महामार्गाच्या निर्मितीमध्ये तुम्हीही थेट गुंतवणूक करु शकता.

Nitin Gadkari : आता महामार्गाच्या निर्मितीमध्ये तुम्हीही थेट गुंतवणूक करु शकता. मुंबईमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याची घोषणा केली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर (Non-convertible debenture) सूचीबद्ध करण्यात आले. गडकरी यांनी घंटा वाजवून या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि प्राधिकरणाच्या अध्यक्ष  अलका उपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, 'मुंबई शेअर बाजारात InvIT नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर सूचीबद्ध होणे ही ऐतिहासिक घटना आहे. कारण यामुळे पायाभूत सुविधा संबंधी निधी पुरवठ्यामध्ये लोकसहभागाचा प्रवेश वाढेल.  किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 25% एनसीडी राखीव ठेवल्या आहेत असे सांगत, InvIT च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून अवघ्या 7 तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली.' ही गुंतवणूक सर्वाधिक विश्वासार्ह असून वार्षिक 8.05 % इतके उत्पन्न देते. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना (सेवानिवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, छोटे आणि मध्यम व्यावसायिक) राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. 10,000 रुपये इतक्या किमान गुंतवणुकीपासून सुरूवात करणे शक्य असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते बांधण्यासाठी मोठी गुंतवणूक महत्त्वाची ठरते. रस्त्यांमुळे देशाचा सामाजिक-आर्थिक विकास शक्य होतो. येत्या काळात किरकोळ गुंतवणुकदार या प्रकल्पांमध्ये मोठ्या संख्येने गुंतवणूक करतील आणि पुढे, हळूहळू संस्थात्मक गुंतवणुकदारांना मागे टाकतील. 26 नव्या द्रुतगती मार्गांसह अन्य काही प्रकल्प नियोजित आहेत ज्यांमुळे गुंतवणुकीच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील गुंतवणूक कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी गुंतवणुकदारांना केले. पायाभूत सुविधा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वर्धनक्षम असतात आणि त्यातून चांगला परतावा मिळतो,  असे ते म्हणाले.

Non-convertible debenture म्हणजे काय?
नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) एक फायनाशियल इंस्ट्रूमेंट आहे. याचा वापर सार्वजनिक समस्यासाठी पैसे उभरण्यासाठी केला जातो. एनसीडी कंपन्यासाठी आयपीओप्रमाणे पैसे उभारते, पण यामध्ये फरक आहे. एखादी कंपनी एनसीडीमार्फत पैसे उभारल्यास त्याला कर्जाप्रमाणे घेतले जातात. गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदरासोबत आपले पैसे परत मिळतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget