एक्स्प्लोर
Advertisement
Markaz | निजामुद्दीनच्या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील 1400 पैकी 1300 जणांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरू : राजेश टोपे
दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमाला राज्यातील 1400 लोकांपैकी 1300 जणांची माहिती मिळाली आहे. या सर्वांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरू असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील 1400 लोक सहभागी झाले होते. यापैकी 1300 जण सापडले असून त्यांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली. दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मरकज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमला राज्यातून अनेकजण सहभागी असल्याची माहिती मिळाल्याने राज्य सरकार अलर्टवर होतं.
निजामुद्दीनला तब्लिग जमातच्या कार्यक्रमाला देशभरातून लोक गेली होती. महाराष्ट्रातूनही जवळपास 1400 लोक गेली होती. यात प्रत्येक जिल्ह्यातील काही लोकं गेली होती. त्यापैकी 1300 लोकांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरु आहे. त्यांचं ट्रेसिंग झालेलं आहे. सामाजिक संस्था, एनएसएसचे कार्यकर्ते, होमगार्ड यांच्या सर्वांच्या साहाय्याने त्यांना विश्वासात घेऊन क्वॉरंटाईन करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारीही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.
Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना
मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.)
Ration Distribution | तीन महिन्यांचं नाहीतर दर महिन्याला धान्य मिळणार; छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
अहमदनगर
मुंबई
राजकारण
Advertisement