Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा
Fatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझा
मुंबईच्या एलबीएस रोडवर कुर्ला परिसरात काल (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात (Kurla Best Bus Accident) झाला होता. या अपघातात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू असून 49 जण जखमी झाले आहेत.
बेस्ट बस कुर्ला येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट गर्दीत शिरली. या अपघातात अनेकजण चिरडले गेले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कुर्ला येथील अपघातात 55 वर्षीय कणीस फातिमा अंसारी यांचा ही मृत्यू झाला. ते जिथे अपघात झाला त्या रस्त्यावर असलेल्या देसाई रुग्णालयमध्ये काम करीत होत्या. काल त्या कामावर जात असताना रुग्णालयाच्या समोरच हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. घरात मुलाचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र हा अपघात झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दोन मुली दोन मुले आहेत.