एक्स्प्लोर
Advertisement
Corona Lockdown | 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? पंतप्रधानांनी दिल्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोरोना उपाययोजनांची प्रभावी माहिती दिली.
मुंबई : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर काय करावं? याच्या सूचना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये दिलेल्या सूचना :
- लॉकडाऊन संपविल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती भाग सुरु होतील हे पाहावे.
- देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे संकट टळले नाही. आपल्याला सोशल डिस्टनसिंग किंवा सामाजिक अंतर राखायचे आहे. त्यासाठी मास्क वापरले पाहिजे किंवा घरगुती स्वच्छ कपड्याचा मास्क म्हणून उपयोग करू शकतो. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
- कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञानांचा उपयोग करा.
- कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.
- निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती, तज्ज्ञ यांचे टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या.
- लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिद्धी मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.
- ग्रामीण भागत अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम गर्दी होईल असे करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.
- पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होत आहे. तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.
- 11 हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.
- आयुष मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळत आहेत .आपणही काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.
Corona | सर्वधर्मीय गुरुंना गर्दी न होण्याबाबत आवाहन करा, मुख्यमंत्री ठाकरेंची सूचना, पंतप्रधान म्हणाले...
PM Modi conference with Chief Ministers | पंतप्रधान मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement