एक्स्प्लोर

Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारावरून एकनाथ खडसे यांनी महायुतीवर निशाणा साधलाय.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपद तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे चित्र आहे. गृहमंत्रीपदासह इतर महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महायुतीला डिवचले आहे.   

एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळलेली आहे. दिवसाढवळ्या लोकांचे अपहरण करून खून केले जात आहेत. परभणीत मोठा हिंसाचार उसळला. त्यामुळे ज्यांना कुणाला गृहमंत्रीपद द्यायचं असेल, त्यांना तात्काळ गृहमंत्रीपद देण्यात यावे, जेणेकरून राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, असे त्यांनी म्हटले. 

तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी बराच वेळ लागला. आता देखील मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाची भावना या निमित्ताने दिसून येत आहे. तिघांना वाटत असेल की, आपल्याला जास्त मंत्रिपद मिळावी. त्यामुळे कदाचित हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असावा. ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपद मिळणं हे स्वाभाविक असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.  

आम्ही पराभव मान्य केलाय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. याबाबत विचारले असता एकनाथ खडसे म्हणाले की,  महाराष्ट्रातील निकालावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. आम्ही निवडणूक खूप जवळून बघितली. त्यामुळे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे वाटले नव्हते. महायुतीचे सर्व आमदार मोठ्या मताधिक्याने तर महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार फार कमी मताधिक्याने निवडून आले. काही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तर त्यांच्या गावात शून्य मतदान होते. त्यामुळे संशयाला जागा आहे. परंतु तरी आम्ही पराभव मान्य केला असून पुढील वाटचाल सुरू केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  

शरद पवार-अजित पवार भेटीवर काय म्हणाले खडसे? 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, राजकारणामध्ये आपण एकमेकांबद्दल आदराची, सन्मानाची भावना कायमचं पाहत आलो आहोत. त्यामुळे सर्व राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपल्या राज्यातील चांगली प्रथा आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांनी आज सकाळी शरद पवार साहेबांना भेटून त्यांच्या आशीर्वाद घेतले, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : आईचा मृतदेह आणण्यासाठी  ॲम्ब्युलन्ससाठी पैसे मागितलेKurla Bus Accident : अपघातात आईचा जीव गेला; मुलीची उद्विग्न प्रतिक्रियाAjit Pawar Meet Amit Shah : अमित शाहांशी ऊसाच्या प्रश्नावर चर्चेसाठी आलो - अजित पवारDevendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Embed widget