एक्स्प्लोर

One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रिया

Union Cabinet Clears One Nation, One Election Bill: नवी दिल्ली: भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या 'एक देश, एक निवडणूक' (One Nation, One Election) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने 'वन नेशन, वन इलेक्शन' संदर्भातील अहवाल तयार केला होता. या अहवालात 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाच्या बाजूने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात 'एक देश, एक निवडणूक' विधेयक संसदेत सादर केले जाईल, अशी चर्चा होती. त्यानुसार आता केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) या विधेयकाला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाईल. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायद्याचे रुप प्राप्त होईल. त्यामुळे आता एनडीए सरकार 'एक देश, एक निवडणूक' विधेयक संसदेत कधी मांडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात हे विधेयक मंजुरीसाठी संसदेच्या पटलावर मांडले जाऊ शकते.

मात्र, इंडिया आघाडीचा 'एक देश, एक निवडणूक' असणारा विरोध पाहता या विधेयकाला इतक्या सहजासहजी मंजुरी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. 'एक देश, एक निवडणूक' हा भाजपच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी विषय आहे. देशात तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर भाजप 'एक देश, एक निवडणूक' हे धोरण पुढे नेईल, याबाबत अंदाज वर्तविले जात होते. हे अंदाज आता खरे ठरण्याची शक्यता आहे.

लोकसभेत 'एक देश, एक निवडणूक'  विधेयकाला विरोध झाल्यास ते संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवले जाऊ शकते. मात्र, सत्ताधारी एनडीए आघाडी 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला यंदाच्या अधिवेशनात मंजूर करवून घेऊ शकते का? हे पाहावे लागेल. या विधेयकावरुन संसदेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील घटकपक्ष काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. 'एक देश, एक निवडणूक' हे विधेयक संसदेत मंजूर झाले तरी त्याची अंमलबजावणी  2029 पासून होईल. 

निवडणूक व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हासकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 07 January 2025  06AM SuperfastCRZ Scam Special Report | मुंबईत कोट्यवधींचा सीआरझेड घोटाळा, भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये फेरफार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget