Crime News : भारताची बॉर्डर क्रॉस करण्याआधीच पोलिसांचा घेराव; 48 तासांत आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद
Crime News : चोरी केल्यानंतर चोराच्या एक पाउल पुढे जावून, वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.
Crime News : चोरी केल्यानंतर चोर पोबारा करतात आणि पोलीस त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडतात. आपण अनेक सिनेमांमध्ये असंच काहीशी दृश्य अनेकदा पाहतो. यावेळीही चोरांनी चोरी केली, पोलिसांनी त्यांचा शोधही घेतला पण विमानानं. चोरांच्या एक पाऊल पुढे विचार करत पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे आतंरराष्ट्रीय टोळी अटकेत आली आहे.
चोरी केल्यानंतर चोराच्या एक पाउल पुढे जावून, वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. यात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून, एक आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याजवळून पाच लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपी नेपाळचे राहणारे असून, भारतात ते सिक्युरिटी गार्डचं काम करत होते.
वसईच्या माणिकपूर पोलिसांना एक आतंरराष्ट्रीय टोळी जेरबंद करण्यात यश आलं आहे. चोरट्यांनी चोरी करुन पळून गेल्यानंतर ते भारताची बॉर्डर ओलांडण्याच्या आधी त्या ठिकाणी पोहोचून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
धरमराज ढकाल, राजेश जोशी उर्फ तप्तराज देवेकोटा आणि अर्जुन ढकाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. यांच्यातील चौथा आरोपी फरार आहे. चौघे आरोपी वसई विरार परिसरात सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करायचे. दिनांक 7 जानेवारीला या चौघांनी वसईच्या सनसीटी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी बाथरुमची लोखंडी जाळी तोडून, घरफोडी केली होती. या टोळीनं चोरी केल्यानंतर लगेच पोबारा केला. पोलिसांनी सीसीटीवीच्या मदतीनं या टोळीचा शोध लागला. आणि ही टोळी लगेच भारताची बॉर्डर पार करुन, नेपाळमध्ये जाणार असल्याची माहितीही मिळाली. त्यांना भारतात पकडावं लागेल या दृष्टीने माणिकपूर पोलीस थेट विमानानं प्रवास करुन, नेपाळ बॉर्डरवर पोहचले. चोरांनी भारताची बॉर्डर क्रॉस करण्याआधीच पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरुन, अवघ्या 48 तासांत तिघांना पकडलं. यातील एक आरोपी फरार झाला आहे. या तिघांकडून घरफोडीतील पाच लाख 24 हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या टोळीवर अनेक पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Thane Crime News : घरफोडी आणि दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई
- कुरिअर बॉयने बंदुकीच्या धाकावर टाकला दरोडा, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
- Indapur Shocking: गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीतल्या मुलीची आत्महत्या, इंदापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा