Indapur Shocking: गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून नववीतल्या मुलीची आत्महत्या, इंदापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Indapur Shocking: आत्महत्या करण्यापूर्वी मृत मुलीनं लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलीय.
Indapur Shocking: गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीनं आत्महत्या केलीय. ही घटना इंदापूर तालुक्यातील (Indapur) बोरीत गावात (Bori Village) बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडलीय. आत्महत्या करण्यापूर्वी मृत मुलीनं लिहलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलीय. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी गावातील तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी संबंधित मुलीनं बुधवारी संध्याकाळी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेसंदर्भात गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भवानीनगर पोलिसांनी दिली. त्यानंतर भवानीनगर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी संबंधित मुलीच्या वडीलांनी पोलिसांकडे फिर्याद दिलीय. या मुलीनं गावतील मुलांच्या छेडछाडीला वैतागून आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहलंय. तसेच आई वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून आत्महत्याचा निर्णय घेत असल्याचंही तिनं चिठ्ठीत लिहलयं. ही चिठ्ठी पोलिसांना आणि नागरिकांना मिळाली. गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती अशी माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
मृत मुलीनं चिठ्ठीत लिहल्यानुसार गावातील तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलीय. या घटेनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. लवकरच या घटनेमागचं सत्य समोर येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-
- माफियांचा कहर! वाळू वाहतुकीला विरोध केल्यानं युवकाला घरात घुसुन विष पाजलं, बुलढाण्यात गुन्हा दाखल
- Yavatmal Crime : उमरखेड्यातील बालरोगतज्ज्ञ हत्त्या प्रकरणात आरोपी शोधण्यासाठी पोलिसांची 5 पथक तैनात
- फेसबुकवर सांगायचा चित्रपट दिग्दर्शक, पण होता घरगडी; नवोदित अभिनेत्रींना फसवणारा खंडणीखोर अटकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha