(Source: Poll of Polls)
Amey Khopkar On shishir Shinde: 'शिशीर काका, बस करा हो आता!', शिशीर शिंदेंच्या पक्षप्रवेशावर अमेय खोपकरांचा टोला
Amey Khopkar On shishir Shinde: शिशिर शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनाला जय महाराष्ट्र केला असून ते आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
Amey Khopkar On shishir Shinde: ठाकरे गटातील नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिशिर शिंदेंच्या जाण्याने ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसला आहे. तर, शिंदे गटात इनकमिंगचे सत्र सुरुच आहे. शिशिर शिंदेंच्या या निर्णयावर मनसेचे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी टोला लगावला आहे. अमेय खोपकरांनी ट्विट करत शिशिर शिंदेवर निशाणा साधला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसनेतील गळतीचे सत्र अजूनही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अमेय खोपकरांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
अमेय खोपकरांनी ट्विट करत शिशिर शिंदेंना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, शिशीर काका, बस करा हेा आता हे धंदे ...,खरतर निवृत्तीचे वय झालंय, इकडून तिकडे बेडूक उड्या मारणे शेाभत नाही. मागे वळून बघण्याचा विचार सुद्धा करू नका. सतत बाळासाहेब, बाळासाहेब करून ना कधी सहानुभूती मिळाली आणि ना कधी मिळणार. आता घरी बसून आराम करा. फुकटचा पण प्रामाणीक सल्ला आहे, घ्यायचा तर घ्या नाहीतर सोडून द्या.' त्यामुळे आता खोपकरांच्या या ट्विटची चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरु आहे. तसेच अमेय खोपकरांच्या या टीकेला शिशिर शिंदे काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
शिशीर काका, बस करा हेा आता हे धंदे ...
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 18, 2023
खरतर निवृत्तीचे वय झालंय
इकडून तिकडे बेडूक उड्या मारणे शेाभत नाही. मागे वळून बघण्याचा विचार सुद्धा करू नका.
सतत बाळासाहेब, बाळासाहेब करून ना कधी सहानुभूती मिळाली आणि ना कधी मिळणार.
आता घरी बसून आराम करा.
फुकटचा पण प्रामाणीक सल्ला आहे,…
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिशिर शिंदेंनी त्यांना साथ देत शिवसेना सोडली होती. त्यानंतर 19 जून 2018 ला शिशिर शिंदे यानी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. पण घरवापसी नंतर तब्बल चार वर्षे पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
शिशिर शिंदेंनी का घेतला पक्ष सोडण्याचा निर्णय?
शिशिर शिंदे यांनी पक्ष सोडण्याची त्यांची भूमिका त्यांच्या राजीनाम्यामध्ये सविस्तर मांडली आहे. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंकडे त्यांचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत त्यांच्या राजीनाम्यात व्यक्त केली. 'चार वर्षे आपल्याला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती, नंतर आपल्याला शोभेचं पद देण्यात आलं, त्यामुळे आपल्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेल्याचं शिशिर शिंदे यांनी पत्रात लिहिलंय. आपल्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो' असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिशिर शिंदे हे 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत