आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत
Sanjay Raut News : आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील.
![आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत shiv sena Sanjay Raut News devendra fadanvis amit shah Narendra Modi आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/05/930663eec9a1138664273f01433e3ddc1685944685482359_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Raut News : सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे तीन जण देश चालवत आहेत. उद्या आमचं सरकार येऊ द्या, मोदी-शाह आणि फडणवीस 24 तासांत शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर तुम्ही सामनामध्ये बातमी वाचाल ईडीच्या भीतीने शाह, मोदी, फडणवीस शिवसेनेत प्रवेश करणार, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबीरात बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी चौफेर टीका केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली, त्याशिवाय मोदी-शाह यांच्याशी आमचे कोणतेही भांडण नाही, आमचे भाडंण महाराष्ट्रद्रोह्याशी आहे, असेही सांगितले. 2024 ला सुद्धा हा देश आपल्याला ताब्यात घय्याचा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत राहायचे की नाही, काय म्हणाले संजय राऊत ?
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलेय. ते म्हणाले की, आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पीक आलाय. माझ्यासमोरही एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यामान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असते, असे संजय राऊत म्हणाले.
स्वबळाचा नारा -
संजय राऊत यांनी यावेली स्वबळाचा नारा दिला. महाराष्ट्रात भगवा फडकवू असे त्यांनी म्हटले. मुंबईत आमचीच सत्ता येणार..त्याशिवाय महाराष्ट्रातही स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचाय, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना चोरता येणार नाही -
शिवसेना एकच आहे. डुप्लिकेट माल खूप असतात. जत्रेतले सूर्य चंद्र आहेत, त्यांच्यासोबत आता लोक फोटो काढतील, असा टोला राऊंतांनी शिंदेंना लगावला. आपला पक्ष हा अब्दूल सत्तरांचा बोगस बियाणे नाहीये, हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्सल खरं बियाणे आहे. आमची शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. बरेच नेते केंद्रातून मुंबईत येतात. जेपी नड्डा येतायेत, अमित शाह येतात. मुंबई का कब्जा लेंगे म्हणताय ? तुझ्या बापाची आहे का मुंबई? हिंम्मत असेल तर निवडणूक घ्या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. महापौर म्हणजे शहराचा कुंकू असतो. हे कुंकू पुसण्याचं काम केलं जातेय. आमचा लढा महाराष्ट्रद्रोही विरोधात आहे, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)