Coronavirus | जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करत राहाव्या लागणार!
गेल्या काही दिवसाच्या राज्याच्या ठराविक जिल्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे रुग्ण अचानकपणे वाढू लागले आहेत. ते रुग्ण जुन्या विषाणूचे आहेत की, नवीन एखादा विषाणूच्या जनुकीय बदल झाले आहे. त्यामुळे हे पाहणे गरजेचे असते. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने राज्यात विविध निर्बंध आणण्याबाबत राज्य सरकार विचार करत असताना वैद्यकीय तज्ञांच्या मते ज्या ठिकाणी अचानकपणे कोरोना बाधितांची संख्या वाढीस लागली आहे. त्या ठिकाणच्या परिसरातील नमुन्याचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात राहणे गरजेचे ठरणार आहे. विषाणूचे जनुकीय बदल (म्युटेशन) ही शास्त्रीय प्रक्रिया असून त्यावर आरोग्य यंत्रणांनी बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे जर कुठे एखादा नवीन विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असेल आणि वेगाने पसरून नागरिकांना बाधित करत आहे का, नाही याची नोंद प्रशासनाला घेणे शक्य होणार आहे.
गेल्या काही दिवसाच्या राज्याच्या ठराविक जिल्यात आणि शहरात कोरोनाबाधितांचे रुग्ण अचानकपणे वाढू लागले आहेत. ते रुग्ण जुन्या विषाणूचे आहेत की, नवीन एखादा विषाणूच्या जनुकीय बदल झाले आहे. त्यामुळे हे पाहणे गरजेचे असते. त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणूपासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल. तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रिअॅक्टिव्हेशन) असे म्हणतात. याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनःसंसर्ग (रिइन्फेक्शन) झाले आहे, असे म्हणतात. मात्र हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुण्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात.
याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात की, "कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येक पॉझिटीव्ह व्यक्तीत्च्या संपर्कातील 18-20 लोकांच्या चाचण्या केल्याच पाहिजेत. पूर्वी ज्या ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या त्रिसूचीचा वापर केला जात होता त्यापद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच विशेष म्हणजे विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात राहणे गरजेचे आहे. कारण त्या पद्धतीने नवीन जनुकीय बदल आढळून येत आहे. त्याचे नमुने तपासून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. यापूर्वी सांगतिल्याप्रमाणे, नागरिकांनी विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांना घाबरण्याची गरज नाही मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. विषाणू ज्या ठिकाणी आहे त्या प्रांतानुसार कालांतराने जनुकीय बदल हे होत असतात. हे सध्या कोरोनाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. मात्र आमच्या प्रॅक्टिसमध्ये विशेष करून दरवर्षीं 'फ्लू'च्या लसीमध्ये नवीन बदलानुसार लस येत असते हे काही नवीन नाही. लसींमध्ये सुधारीत बदल होणं ही शास्त्रीय पद्धतीचा भाग आहे.
तर, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, "सोमवारी दिवसभरात राज्यातील प्रमुख शहरात सुदैवाने एकही मृत्यची नोंद झाली आहे. या प्रकाराने हुरळून जाण्याची गरज नाही. पुढचे काही दिवस हे राहतात ते बघणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी अचानकपणे बाधितची संख्या वाढत आहे अशा सर्व जिल्ह्यातील काही नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे. त्यामुळे जे एखादा नवीन जनुकीय बदल झालेला विषाणू असेल तर तो ताबडतोब आपल्या लक्षात येईल, जे का तो वेगाने पसरत असेल तर त्याला घालण्यासाठी तात्काळ त्या परिसरात नवीन निर्बध लादणे शक्य होईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :