कोरोनाचे आकडे वाढताहेत! महत्वाच्या शहरात बेड्सची स्थिती काय? जाणून घ्या..
राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील बेड्सची स्थिती काय आहे? जाणून घेऊयात.
मुंबई : कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे तशी आरोग्य यंत्रणाची खडबडून पुन्हा जागी झाली आहे. अनेक ठिकाणचे बंद केलेले कोविड सेंटर्स पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. पहिल्या वेळी कोरोनाचे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती त्यावेळी अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यी झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. मात्र आता कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का? राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील बेड्सची स्थिती काय आहे? जाणून घेऊयात.
मुंबई महापालिका बेड नियोजन
मुंबई अॅक्टिव्ह रुग्ण - 6900
एकूण बेड - 11,968 रुग्णांना दिलेले बेड - 3169 शिल्लक बेड - 8799
DCH & DCHC बेड - 11205 रुग्णांना दिलेले बेड - 3082 शिल्लक बेड - 8123
ICU बेड - 1528 रुग्णांना दिलेले बेड - 553 शिल्लक बेड - 975
ऑक्सिजन बेड - 6174 रुग्णांना दिलेले बेड - 1359 शिल्लक बेड - 4815
व्हेंटिलेटर बेड - 959 रुग्णांना दिलेले बेड - 363 शिल्लक बेड - 596
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद महापालिका बेड नियोजन
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 814
एकूण बेड - 4755 रुग्णांना दिलेले बेड -902 शिल्लक बेड - 3853
DCH & DCHC बेड - 2755 रुग्णांना दिलेले बेड - 804 शिल्लक बेड - 1951
ICU बेड - 407 रुग्णाना दिलेले बेड - 109 शिल्लक बेड - 298
ऑक्सिजन बेड - 1015 रुग्णांना दिलेले बेड - 123 शिल्लक बेड - 892
व्हेंटिलेटर बेड -229 रुग्णांना दिलेले बेड - 48 शिल्लक बेड - 251
Corona Virus: शक्य असेल तिथं 'वर्क फ्रॉम होम' सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही
नाशिक महापालिका बेड नियोजन
एकूण बेड - 3284 रुग्णांना दिलेले बेड - 286 शिल्लक बेड - 2998
DCH & DCHC बेड - 2578 रुग्णांना दिलेले बेड - 286 शिल्लक बेड - 2292
ICU बेड - 515 रुग्णांना दिलेले बेड - 79 शिल्लक बेड - 436
ऑक्सिजन बेड - 1288 रुग्णांना दिलेले बेड - 115 शिल्लक बेड - 1173
व्हेंटिलेटर बेड - 271 रुग्णांना दिलेले बेड - 31 शिल्लक बेड - 240
Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध लागू?
नागपूर शहरातील बेड्सचं नियोजन
- नागपूरात 2 डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (DCC) आहेत
- GMC हॉस्पिटलमध्ये 1000 बेड्सची क्षमता
- मेयो हॉस्पिटलमध्ये 660 बेड्सची क्षमता
- नागपुरात सध्या 1 कोविड केयर सेंटर (CCC)
- पाचपाऊली 150 बेड्सची क्षमता
- नागपूर मनपाचे 2 डेडिकेटेड कोविड केयर हेल्थ सेन्टर (DCHC)
- आयसोलेशन hospital 35 बेड्स
- इंदिरा गांधी महापालिका हॉस्पिटल 110 बेड्स