BLOG | होय, मी जबाबदार!
कोरोना हा आजार किती भयंकर याची प्रचिती गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला आली आहे. लाखो नागरिक या आजरामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या आजराची गंभीर लक्षणे असलेल्यांची प्रकृती किती गंभीर होते हे सगळ्यांनीच पहिले आहे. कोणत्याही विषयात राजकारण होऊ शकते त्यामुळे कोरोनाचा आजार हा विषय कसा अलिप्त राहील, त्याप्रमाणे राजकीय पक्ष त्यांची विविध मते मांडत असतात.
कोरोनाबाधितांची अचानक संख्या कशी वाढली? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. मात्र प्रत्येकजण त्यांच्या सोयीनुसार याचा अर्थ काढत बिनधास्तपणे आपली मतं व्यक्त करताना दिसत आहे. प्रत्येकजण आपली थिअरी सांगत आहे, कुणी टिंगल टवाळी करत आहेत तर कुणी आताच कसा वाढला कोरोना? यावरून प्रश्न निर्माण करत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. अनेक वैद्यकीय तज्ञांच्या मते या आजारांवर नियंत्रण मिळवू शकतो, मात्र तो कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मोठा कालावधी जावा लागतो. राज्यात कोरोनाचा आजार काल होता, आजही आणि उद्याही राहणार आहे, हे आता नागरिकांनी समजून घ्यावे लागणार आहे. स्वाईन फ्लूचे रुग्ण दहा वर्षानंतर आजही सापडत आहे, त्यांची फक्त संख्या कमी झाली आहे . एखाद्या आजराची तीव्रता कमी होऊ शकते मात्र तो आजार संपला असा गैरसमज कुणी करून घेऊ नये. या कोरोनाच्या विषाणूमध्ये अनेक जनुकीय बदल (म्युटेशन) होत आहेत. हा आजार होऊ नये म्हणून 'लस' आली आहे तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. बहुतांश सर्वसामान्य लोकांना लस मिळण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे. त्यामुळे या आजराचा संसर्ग होऊ द्यायचा नसेल तर मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि हात स्वच्छ धूत राहणे. नागरिकांनी आपली जबाबदारी वेळेवरच ओळखली पाहिजे.
कोरोना हा आजार किती भयंकर याची प्रचिती गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला आली आहे. लाखो नागरिक या आजरामुळे मृत्युमुखी पडले आहेत. या आजराची गंभीर लक्षणे असलेल्यांची प्रकृती किती गंभीर होते हे सगळ्यांनीच पहिले आहे. कोणत्याही विषयात राजकारण होऊ शकते त्यामुळे कोरोनाचा आजार हा विषय कसा अलिप्त राहील, त्याप्रमाणे राजकीय पक्ष त्यांची विविध मते मांडत असतात. खरे पहिला गेले तर आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नागरिकांचे आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल याचा एकत्रित बसून विचार करून त्यापद्धतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. सर्व पक्षाचे नेते, सर्व जाती-धर्मातील धर्मगुरू, संत, कीर्तनकार, बाबा मंडळींनी यांनी या कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आधुनिक तंत्रज्ञनाचा उपयोग करून नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याची गरज आहे. आरोग्याच्या समस्येसमोर बाकी सगळ्या गोष्टी या दुय्यम आहेत, नागरिकांचे आरोग्य हीच प्राथमिकता ओळखून काम करावे लागणार आहे. कोरोना बाधितांचा रोजचा आकडा वाढत असला तरी योग्य उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र याचा अर्थ बेफिकीर होऊन चालणार नाही.
याप्रकरणी , राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित सांगतात की, "कोरोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येक पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील 18-20 लोकांच्या चाचण्या केल्याच पाहिजेत. पूर्वी ज्या ट्रॅकिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या त्रिसूचीचा वापर केला जात होता त्यापद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच विशेष म्हणजे विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात राहणे गरजेचे आहे. कारण त्या पद्धतीने नवीन जनुकीय बदल आढळून येत आहे. त्याचे नमुने तपासून त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. यापूर्वी सांगतिल्याप्रमाणे, नागरिकांनी विषाणूमध्ये होणाऱ्या जनुकीय बदलांना घाबरण्याची गरज नाही मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. विषाणू ज्या ठिकाणी आहे त्या प्रांतानुसार कालांतराने जनुकीय बदल हे होत असतात. हे सध्या कोरोनाच्या बाबतीत घडताना दिसत आहे. मात्र आमच्या प्रॅक्टिसमध्ये विशेष करून दरवर्षीं 'फ्लू'च्या लसीमध्ये नवीन बदलानुसार लस येत असते हे काही नवीन नाही. लसींमध्ये सुधारीत बदल होणं ही शास्त्रीय पद्धतीचा भाग आहे.
डॉ. पंडित पुढे असेही सांगतात की, "नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहण्याची गरज आहे. कारण सुरक्षिततेचे नियम पाळले गेले तर या आजाराचा संसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. काही नागरिक यामध्ये नियम धाब्यावर बसून आपले दैनंदिन काम करताना दिसत आहे, तेच सर्वात धोकादायक आहे. लसीकरणाबत असे आहे की, त्या लसीची परिणामकारकता (या आजाराविरोधातील प्रतिपिंड निर्माण होण्यासाठी) जाणवण्यासाठी किमान दुसऱ्या डोसनंतर 15 दिवस जावे लागतात. त्यामुळे लसीचे डोस घेतल्यानंतर सुद्धा 45 दिवस काळजी घेतलीच पाहिजे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झाला याचा आणि लसीच्या गुणवत्तेचा काही संबंध नाही. त्यामुळे लस सगळ्यांनी घेली पाहिजे आपल्याकडे ज्या लसी आहेत त्या सुरक्षित आहेत.
फेब्रुवारी 18 ला, कारवाई आणि दंडुकेशाही! या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोनाला आता महाराष्ट्रात येऊन पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल, तरी आपल्याकडे अजून कोरोनाची पहिलीच लाट संपलेली नाही. कोरोनाचा आलेख कायम वाढता आणि कमी होताना राहिलेला आहे. राज्यात परिस्थिती पुन्हा चितांजनक होत चालली आहे. काही गोष्टींना मोकळीक दिली आणि कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाला. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा ओरडून सांगतेय नियम पाळा. मात्र याचं कुणाला काही सोयरसुतक नाही. अनेक जण आपल्या मस्तीत जगत आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र दिसत असताना प्रशासनाने कारवाई ढिली केली मात्र नियम कायम तसेच ठेवले. आपल्याकडे प्रेमाने सांगून कुणी ऐकत नाही त्यांना कारवाई किंवा दंडुकेशाहीचा धाक दाखवावा लागतो मग ते ऐकतात असं काहीसं चित्र राज्यातील विविध भागात पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली, आर्थिक व्यवस्थेचं कंबरडे मोडले म्हणून ओरड करायची मात्र तो लॉकडाउन पुन्हा होऊ नये याकरिता शासनाने आखून दिलेले साधे सुरक्षिततेचे साधे नियम पाळायचे नाही, अशी सोयीस्कर भूमिका नागरिक घेताना दिसत आहे. या दुट्टपी भूमिकेमुळे हा कोरोना हद्दपार होणार नाही, यामुळे अनेक बळी डोळ्यांसमोर जाताना दिसतील पण आपल्याला हताश होऊन पाहण्या पलीकडे काहीच नसेल, त्यामुळे आता तरी जागे व्हा, मिळलेले एक सुदंर आयुष्य निरोगी कसे ठेवता येईल याचा विचार करण्याची वेळ सगळ्यांवर आली आहे.
मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, "आपल्याला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले होते. मात्र आंदोलने, मेळावे, सभा, संमेलने, निवडणूक, लग्न सोहळे यामुळे निर्माण होणारी गर्दी त्याचप्रमाणे बाजारात, हॉटेलात या ठिकाणी होणारी गर्दी त्यामध्ये विशेष कुणी मास्क लावत नाही, सुरक्षिततेचे नियम पाळत नाही. त्यामुळे कुठेतरी झपाट्याने राज्यातील बाधितांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईत मृत्यू दर फारसा वाढलेला नाही, मात्र संपूर्ण राज्यातील चित्र पहिले तर रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यू दर थोडा वाढला आहे. आपल्या डॉक्टरांनी चांगली उपचारपद्धती जी विकसित केली आहे, त्यामुळे रुग्ण उपचार घेऊन घरी जात आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. सध्या सर्व नागरिकांना रुग्णलयात व्यवस्थित उपचार मिळत आहे. कुठल्याही गोष्टीची टंचाई भासेल अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. जर कोरोनाची लाट थोपवयाची असेल तर नागरिकांनी नियम पाळायलाच पाहिजे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेकरिता हे नियम पाळले तर त्याचा समाजाला अधिक फायदा होईल."
गेल्या वर्षभर कोरोनाच्या आजाराविरोधात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा लढत आहे. त्या लढाईत त्यांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन सुद्धा केले होते मात्र काही प्रमाणात ढिलाई आल्याने पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले. पूर्वी जय पद्धतीने नागरिकांच्या वावरावर निर्बंध आणले होते तसे येऊ नये असे वाटत असेल तर नियम पाळलेच पाहिजे. प्रत्येक नागरिक नियम पाळतो की, नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या मागे एक पोलीस ठेवणे शक्य नाही. या समाजाप्रती नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहे त्याचे पालन करण्याची हीच ती वेळ आहे. शासनाने सांगितलेले नियम पाळले तर कोरोनाच्या या संसर्गजन्य आजाराला पायबंद करण्यात आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा त्यांचे काम करीत राहणार आहे. भविष्यात कोरोनाच्या या आजराबद्दल जे काही होईल त्याला 'नागरिक' म्हणून आपणच जबाबदार राहणार आहोत.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग :
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली
- BLOG | 2021 : लसीकरणाच्या नावानं चांगभलं!
- BLOG | मृत्यूदर कमी होतोय!
- BLOG | रात्रीच्या संचाराला 'बंदी' का?
- BLOG : मिशन झिरोच्या दिशेने वाटचाल!
- BLOG | हम साथ साथ है!