एक्स्प्लोर

मुंबईत बाथरुममध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू, गिझरमधील वायूमुळे दुर्दैवी अंत

ध्रुवी गोहिल सकाळी आंघोळीसाठी गेली. मात्र तासाभरानंतरही ती बाथरुममधून बाहेर आली नाही. घरच्यांनी जोर लावून दरवाजा उघडला तेव्हा ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती.

मुंबई : मुंबईतील बोरीवली पश्चिम गोराई इथे एका 15 वर्षीय मुलीचा बाथरुममध्ये आंघोळ करत असताना मृत्यू झाला. गिझरमधून आलेल्या विषारी वायूमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ध्रुवी गोहिल असं या मुलीचं नाव असून ती दहावीत शिकत होती. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच ध्रुवीचा वाढदिवस होता. ही घटना 10 जानेवारीची ही घटना आहे. ध्रुवी गोहिल सकाळी आंघोळीसाठी गेली. मात्र तासाभरानंतरही ती बाथरुममधून बाहेर आली नाही. त्यामुळे घरच्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोठावला. दरवाजा आतून बंद होता. घरच्यांनी जोर लावून दरवाजा उघडला तेव्हा ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती. शिवाय तिचा पाय गरम पाण्यामुळे भाजला होता. तसंच चार फुटांपर्यंत विषारी वायू बाथरुममध्ये पसरलेला होता. कुटुंबियांना तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र 24 तासानंतर म्हणजेच 11 जानेवारीला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या वायूचा कुठलाही रंग नसतो किंवा याला कसलाही वास नसतो. त्यामुळे तो गॅस पसरल्यास पटकन समजत नाही. या गॅसमुळे ध्रुवीच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही आणि ती बेशुद्ध पडली, अशी माहिती मंगलमूर्ती रुग्णालयाचे डॉक्टर विवेक चौरसिया यांनी दिली. आपल्या मुलीसोबत जी घटना घडली ती अजून कोणासोबत घडू नये यासाठी ध्रुवीच्या वडिलांनी लोकांना गिझर बाथरुमबाहेर लावण्याचा आग्रह केला आहे. तसंच पाणी शक्यतो गरम करुन वापरण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन अजून कुठल्या कुटुंबावर ही वेळ येणार नाही. कोणत्या परिस्थितीत गिझर घातक? - बाजारात इलेक्ट्रिक गिझरला जास्त मागणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात अनेक जण  गॅस गिझरचा पर्यायही निवडू लागले आहेत. गॅस गिझरच्या बाथरुममध्ये व्हेंटिलेशन नसेल तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते. - गॅस गिझरमुळे वाफ तयार होते. बाथरुमधून वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग नसेल तर मोठ्या प्रमाणावर वाफ साठत जाते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी, तेथे कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरुवात होते. - त्यानंतरही गॅस गिझर चालूच राहिला तर ऑक्सिजन नाहीसा होऊन संपूर्ण कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे श्वास गुदमरतो, असं तज्ज्ञ सांगतात. गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यावी? - बाथरुममध्ये 'एक्झॉस्ट फॅन' असेल तर व्हेंटिलेशन/वायू व्हिजन चांगलं होईल आणि दुर्घटना टळेल. - गॅस गिझरचा मेन्टेनन्स वेळच्या वेळी करणं गरजेचं. - गॅस गिझर शक्यतो बाथरुमच्या बाहेरच लावा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget