पण त्याचबरोबर असेही काही फळं आणि पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेटेड राहू शकता.
असे '5' पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊया.
खरबूजात 80 ते 90 % पाणी असते. खरबूजात व्हिटॅमिन B 6, E तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते.
कांदा उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा उष्माघातापासून तुमचे संरक्षण करतो.
पपईमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीराला हायड्रेट ठेवते.
तुमच्या आहारात काकडीचा समावेश करा. शरीर हायड्रेटसाठी चांगला पर्याय आहे. काकडीत 90 ते 95% टक्के पाणी असते. जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगडापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. कलिंगडमध्ये 92 ते 95% पाणी असते जे तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.