एक्स्प्लोर

Ghibli image generator: मुडदा बसवला त्या घिबली-गिबलीचा! स्वामी समर्थांना साईबाबा करुन टाकलं, 'तो' फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Ghibli image: नवऱ्याऐवजी दुसराच मुलगा फोटोत, गुढीपाडव्याच्या फोटोतही प्रचंड मोठा घोळ, घिबली इमेज पाहून नेटकऱ्यांना धडकीच भरली. सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल.

Ghibli image: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घिबली इमेजेसने  धुमाकूळ घातला आहे. घिबली इमेज हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेले तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून चॅटजीपीटीवर तुम्हाला स्वत:च्या ॲनिमेटेड प्रतिमा तयार करता येतात. आतापर्यंत कोट्यवधी युजर्सनी घिबली इमेजेसचा वापर करुन आपल्या प्रतिमा तयार केल्या आहेत. भारतासह जगभरातून याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने ओपन एआयचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असलेले हे टूल बंद पडले होते. घिबली इमेज तयार करुन घेण्यासाठी एकाचवेळी लाखो युजर्स चॅटजीपीटीचा वापर करत असल्याने ओपन एआयच्या सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. त्यामुळे घिबली इमेज तयार करताना अनेक चुका होत असल्याचेही समोर आले आहे. 

यापैकी काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी एका फोटोत एका एका महिलेने तिचा नवरा आणि दोन लहान मुलींसह घिबलीवर फोटो अपलोड केला होता. मात्र, त्याची ॲनिमेटेड इमेज तयार होताना फोटोत नवऱ्याऐवजी दुसराच लहान मुलगा दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत एका जोडप्याने गुढीपाडव्याचा फोटो टाकला आहे. गुढीसह नवरा-बायकोचा फोटो अपलोड करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष घिबली इमेज तयार होताना त्याठिकाणी गुढीच्या ऐवजी एक पाठमोरी बाई दिसत आहे. या सगळ्यावर कळस म्हणजे एआय टुलला अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि साईबाबांमध्ये फरक ओळखता आलेला नाही. एका युजरने स्वामी समर्थांचा प्रकटदिनी त्यांच्या तसबिरीसोबत एक फोटो काढला होता. या फोटोची घिबली इमेज तयार करण्यासाठी युजरने हा फोटो चॅटजीपीटीवर अपलोड केला होता. मात्र, प्रत्यक्षात इमेज तयार होऊन आली तेव्हा डोक्यावर हात मारुन घेण्याची पाळी आली. कारण, या इमेजमध्ये स्वामी समर्थांऐवजी साईबाबा दिसत होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Kapil Anchal (@traumtravellers)

View this post on Instagram
 
A post shared by Kapil Anchal (@traumtravellers)

View this post on Instagram
 
A post shared by Pravin Patil (@pravinpatil4810)

चॅटजीपीटीवर घिबली इमेजच्या फ्री व्हर्जनवर सुरुवातीला कितीही फोटो तयार करता येत होते. मात्र, सर्व्हरवरील लोड वाढल्यामुळे चॅटजीपीटीने फ्री व्हर्जन युजर्सना एका दिवसात केवळ तीन इमेज तयार करुन देण्याचे ठरवले आहे. या सगळ्यामुळे ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांना ट्विट करण्याची वेळ आली होती. त्यांनी युजर्सना घिबली इमेज तयार करण्यापासून ब्रेक घेण्याचे आवाहन केले होते. आमच्या टीमला झोपेची गरज आहे. इमेज जनरेटरमुळे सर्व्हरवर प्रचंड दबाव पडत आहे. आमचे जीपीयू वितळत आहेत. आम्ही इमेज जनरेटवर तात्पुरती मर्यादा लावत आहोत. सर्व्हरची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सॅम अल्टमन यांनी म्हटले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Shubham Patil 🌠 (@_shubhh_patil)

आणखी वाचा

ChatGPT च्या नवीन फीचरने जगाला लावलं वेड; सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेलं ‘Ghibli Portrait’ नेमकं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Embed widget