एक्स्प्लोर

Pune-Mumbai Express highway : अपघातानंतर प्रशासन खडबडून जागं! मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा घाटात अपघाताचे 5 ब्लॅक स्पॅाट निश्चित; हाईट बॅरेकेट्स लावण्यास सुरुवात

आज MSRDC, RTO, महामार्ग पोलीस , स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी मुंबई-पुणे मुंबई - पुणे एक्सप्रेसवेची पाहणी केली. यात या मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. 

Pune-Mumbai Express highway :  मागील काही दिवसांपासून मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. या अपघातात अनेकजण दगावले देखील आहे. लोणावळा घाटात गेल्या 15 दिवसात दोन भीषण अपघात झाल्याने शासकीय यंत्रणा खाडकन जागी झाली आहे. या अपघातात 13 जणांचे बळी गेले तर 12 गाड्यांचा चक्काचूर झाला होता. हे पाहता आज MSRDC, RTO, महामार्ग पोलीस , स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी दौरा केला. यात या मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. 

लोणावळा घाटातील तीव्र उतार, अवघड वळण  यांची पाहणी केली. यात एकूण घाटातील 5 अपघाती ब्लॅक स्पॅाट निश्चित करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लोणावळा वरून येणारी जड वाहणे अंड्डा पॅाईंट वरून खोपोलीत उतरू नये यासाठी हाईट बॅरेकट्स लावली आहेत. जेणे करून घाटातील जुन्या हायवेला ही वाहणे न जाता थेट मुख्य एक्सप्रेसवे वरून खाली उतरतील. त्याच बरोबर सिग्नल वाढविण्यात येणार आहेत. महामार्ग पोलीसांकडून जड वाहनांवर विशेष लक्ष देत त्यांना घाटाच्या आधीच थांबवून पाहणी करण्यात येणार आहे.

या मार्गावर अपघात रोखण्यासाठी खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेला अपघात हा चुकीच्या बाजूने गाडी आल्याने झाला होता. त्यामुळे या संदर्भातदेखील वाहतूक पोलिसांना सूचना दिल्या आहे.
 

दिशादर्शक लावण्याच्या सूचना

या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते त्यात ही वाहनं मोठ्या प्रमाणात लेन कटींग करत असतात परिणामी इतर गाड्यांना वाहनांच्या लेन कटींगमुळे अंदाज घेणं शक्य होत नाही. त्यामुळे यानंतर लेन कटींग करणाऱ्या अवजड वाहन चालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दिशादर्शक फलक नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना रस्ता समजण्यास समस्या निर्माण होत होती. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे सुरुवातीला दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसांत या मार्गावर फलक लावण्यात येणार असल्याची माहिती बारणे यांनी दिली आहे.

LED लाईट्स लावण्याचं नियोजन

या मार्गावर अनेक ठिकाणी कठडे नाही आहेत. त्यामुळे अपघात होतात. रात्रीच्यावेळी ज्या ठिकाणी कठडे आहेत. त्याठिकाणी लाईट किंवा दिशादर्शन नाहीत. टनलमधील लाईट काही प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे ते लाईट्स दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत शिवाय काही ठिकाणी LED लाईट्सदेखील लावण्याचं नियोजन असल्याचं ते म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget