CM Eknath Shinde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची जबाबदारी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं.
CM Eknath Shinde : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही आमची जबाबदारी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून कोणत्याही समाजावर अन्यान होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
आरक्षण देणं ही आमची जबाबदारी
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण हे सकल मराठा समाजासाठी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही फसवणू करणार नाही, आरक्षण देणं ही आमची जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवल्या आहेत, त्या त्रुटींवर सरकारचे काम सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. टिकणारं आरक्षण कसं मिळेल हीच सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला महाराष्ट्रातील जनतेनं मोठा पाठिंबा दिला आहे. ज्याचा हेतू प्रामाणिक असतो, त्याच्या मागे जनता भक्कमपणे उभी असते असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण हीच सरकारची भूमिका आहे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलो
मला देखील या ठिकाणी येण्याच्या संदर्भात काही जणांनी सांगितले होते. पण प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी मनोज जरांगे पाटील यांना भेटायचे ठरवल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कमिटीच्या माध्यमातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम केलं जाईल. यासाठी आपल्याला वारंवार भेटावं लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत लागणार आहे. त्यांच्याकडे असणारी माहिती त्यांनी द्यावी. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे. बाकीच्यांनी देखील त्याच्या तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे. इतके दिवस उपोषण केलं आहे, त्यामुळं तुम्ही रुग्णालयात उपचार घ्यावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकार आरण देणार आहे. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
17 दिवसानंतर जरांगे पाटलांचे उपोषण मागे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: