एक्स्प्लोर

जब तक तोड़ेंगे नहीं, तब त‍क छोड़ेंगे नहीं, 17 दिवसांचं उपोषण, जरांगेंच्या आंदोलनात आतापर्यंत काय काय घडलं?

Manoj Jarange Hunger Strike: 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या आंदोलनात आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या काळात घडलेल्या  महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली.  मुख्यमंत्री शिंदे,गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे या वेळी उपस्थित होते.  आंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे आपलं उपोषण मागे घेतले आहे.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या आंदोलनात आजपर्यंत अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. या काळात घडलेल्या  महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया.

9 ऑगस्ट- मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात धुळे सोलापूर रोडवरील पैठण फाटा येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन,
या ठिकाणी हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकत्रित, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सरकारला दुपारी एक वाजेपर्यंत अल्टिमेटम, मात्र सरकारकडून कुठलाही रिप्लाय न आल्याने चार वाजल्यापासून जवळच असलेल्या अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे आणि इतर आठ जण उपोषणाला बसले.

30 ऑगस्ट-  अंतवरली सराटी गावात, आजूबाजूच्या गावातील आंदोलकांची गर्दी वाढली..जालना बीड आणि औरंगाबाद मधील आंदोलक उपोषणस्थळी येऊ लागले

31 ऑगस्ट- उपोषणात आणखी दोन महिला सहभागी झाल्या आणि मनोज जरांगे सह एकूण 10 आंदोलक उपोषणाला बसली.जरांगे यांची तब्येत देखील खालावली, उपोषणाला गर्दी वाढत  असल्याने कायदा  सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी  पोलिसांकडून मध्यरात्री 2 वाजता आंदोलन स्थळी भेट 

1 सप्टेंबर - आंदोलनात सकाळी गर्दी वाढली,दुपारी 2 नंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा अंतरवली गावात वाढला, आणि 5 वाजता पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या आणि तब्येत खालावत असल्याच्या दृष्टीने, उपोषण मागे घेण्याची विनंती केली, तीन वेळा पोलीस आणि ग्रामस्थ चर्चा झाली,आणि पावणेसहा वाजता उपोषणाच्या व्यासपीठा समोर बसलेल्या आंदोलक आणि पोलीस समोरा समोर आले, आणि एकच गोंधळ सुरू झाला, हा गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी पावणेसहा वाजता लाठीमार केला, आणि संतप्त गावकरी आणि आंदोलकांनी दगडफेक सुरू केली, या घटनेत शेकडो आंदोलक आणि 45 पोलीस जखमी आणि त्याच रात्री अनेक भागात जाळपोळ झाली

2 सप्टेंबर - राज्यभर याचे पडसाद उमटले आणि त्याच दिवशी राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील ,उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, संजय राऊत ,उदयनराजे ,संभाजी राजे यांची उपोषण स्थळी भेट आणि  जखमी आंदोलकांची दवाखान्यात भेट.याच दिवशी सायंकाळी जालन्यातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी  येथे पोलीस आंदोलक आमने सामने ,जाळपोळ आणि लाठीमार

3 सप्टेंबर - जालना आणि इतर भागात घटनेचा निषेध,अनेक ठिकाणी आंदोलने,मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट,मंत्री गिरीश महाजन आणि नितेश राणे यांच्या कडून उपोषणस्थळी भेट जखमींची विचारपूस. या शिवाय रात्री काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची उपोषणस्थळी भेट. याच दिवशी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यावर कारवाई होऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. याच दिवशी आयपीएस शैलेश बलकवडे यांना लजालना अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतला.

4 सप्टेंबर- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट घेतली आणि आंदोलकांशी चर्चा केली. या पूर्वी संभाजीनगरवरून जालना जाताना तीन ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्यात आला. याच दिवशी शिवसेना नेते अर्जुन खोतकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन ,उपोषण मागे घेण्याची मागणी करत आंदोलन स्थळी दाखल झाले,त्याच वेळी महादेव जानकर यांनी उपस्थिती होती, इम्तियाज जलील यांनी याच वेळी संध्याकाळी भेट दिली. याच दिवशी बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली

5 सप्टेंबर- बहुजन वंचित आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणाला भेट दिली, यावेळी सरकार वर टीका करून लाठीमाराच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. याच दिवशी-शासनच शिष्टमंडळ म्हणून मंत्री गिरीश महाजन मंत्री संदिपान भुमरे , मंत्री अतुल सावे माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री अर्जुन खोतकर आले त्यांनी जरांगेंना 30 दिवसाचा वेळ मागितला. मात्र जरांगे यांनी प्रस्ताव नाकारत चार दिवसात GR काढण्यासाठी सरकारला चार दिवसाचा अल्टिमेटम दिला. दरम्यान च्या काळात पाणी आणि सलाईन घेण्याची विनंती मान्य केली.

6 सप्टेंबर- जरांगे यांना तब्येत खालावल्याने सलाईन लावण्यात आले, एक तारखेला झालेला लाठीमार आणि त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये उद्भवलेल्या संघर्षानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समिती मधील अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली. दरम्यान आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे लाठीमार यासंबंधी मनोज जरांगे आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची अप्पर महासंचालक यांना समनव्यकांचे निवेदन.याच दिवशी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकार ला सर्व पुरावे देऊ असे आवाहन केलं.

7 सप्टेंबर- सरकार ने तातडीने GR काढून निझाम काळात वंशावळी मध्ये नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधी शासन निर्णय काढला.याच दिवशी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी GR घेऊन जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे यांनी GR मध्ये सरसकट आणि संपूर्ण महाराष्ट्र शब्द सामील करून बदल करण्याची मागणी केली, दरम्यान खोतकर यांनी जरांगे यांना शिष्टमंडळ तयार करून पुढील बदलासाठी मुंबई च निमंत्रण दिलो.

8 सप्टेंबर- रोजी -जरांगे यांनी 20 ते 21 जनांचे शिष्टमंडळ तयार असून सरकारचा निरोप येई पर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं म्हंटल शिवाय 9 तारखे पर्यत च्या 4 दिवाच्या अल्टिमेटेमवर ठाम असल्याचे जाहीर केलं

9 सप्टेंबर -  मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली असून उद्यापासून सलाईन काढली जाणार आणि पाणीही बंद केलं जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र घेऊन अंतरवाली सराटी गावात पोहोचले तसेच उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं जरांगे यांची भूमीका. त्यामुळे पुन्हा एकदा खोतकर यांना 'रिकाम्या हात' परतावे लागले. 

10 सप्टेंबर - जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणे बंद केले.  कोणतेही उग्र आंदोलन करू नये असे आवाहन जरांगे यांनी केले.

11 सप्टेंबर -  मनोज जरांगेंचं उपोषण आणखी तीव्र केले.  पाणी सोडलं आणि सलाईनही काढलं. या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक बोलवली

12 सप्टेंबर -  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची आणखी मुदत दिली .  त्यांनी दुपारच्या सुमारास ग्रामस्थांशी साधलेल्या संवादात आपल्या प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह त्यांचं मंत्रिमंडळ, तसंच खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती आल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार केला

13 सप्टेंबर - मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.जरांगे यांच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे जालन्याला जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, पत्रकार परिषदेतला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे, विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदेंचा जालना दौरा रद्द 

14 सप्टेंबर -  मनोज जरांगेंचं  उपोषण 17 व्या दिवशी अखेर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. 

हे ही वाचा :

Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंना अंतरवाली सराटीत आणून दाखवलं, उपोषण सोडतानाच जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget