एक्स्प्लोर

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी; केंद्राकडून 260 कोटीचं बक्षीस, सूर्यघर मोफत वीज गेमचेंजर

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसविले व त्यातून त्यांची वीजनिर्मिती क्षमता किती झाली याबाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते.

मुंबई : घरांच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत वीज ग्राहकांना थेट लाभ होत असल्याने योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महावितरणला केली आहे. छतावरील सौर ऊर्जानिर्मितीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी महावितरणला जबाबदारी देण्यात आली आहे.

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसविले व त्यातून त्यांची वीजनिर्मिती क्षमता किती झाली याबाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. आधीच्या वर्षापेक्षा चालू वर्षात किती जास्त कामगिरी झाली यानुसार केंद्र सरकार त्या त्या वीज वितरण कंपनीला यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर रक्कम मंजूर करते. महाराष्ट्र राज्याला छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारकडून 2019 – 20 व 2020 -21 या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे 59 व 37 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली. 2021-22 या आर्थिक वर्षात राज्याची कामगिरी उंचावल्यामुळे केंद्र सरकारकडून 69 कोटी 47 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली. 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी 94 कोटी 91 लाख रुपये मंजूर झाले. 2023 – 24 या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या निकषानुसार 137 कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे.

सूर्यघर मोफत योजनेसाठी

राज्यामध्ये आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता 2738 मेगावॅट आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 81,938 ग्राहकांचा व त्यांच्या एकूण 323 मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे. या ग्राहकांना 647 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. महावितरणने या योजनेत घरगुती वीज वापरासाठी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसविणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मिटर देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येते.

हेही वाचा

हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPrajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धस प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटणारTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Dec 2024City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा; दलित बांधवासह धनंजय मुंडेंचा खास माणूस पोलीस ठाण्यात
Mumbai : मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
मासेमारी करणाऱ्या नौकेला खोल समुद्रात मोठा अपघात; मालवाहू जहाजाने टक्कर मारल्यानं नौका बुडाली
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला
Arvind Kejriwal : या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
या देशात निवडणुकीच्या नावाखाली बदमाशी सुरु; माझ्या मतदारसंघात 15 दिवसात 10 हजार मतदार वाढले; अरविंद केजरीवालांचे सनसनाटी आरोप
Gunaratna Sadavarte : प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, सुरेश धसांचा निषेध, बीडमधील मोर्चाचा 'शिमगा' म्हणून उल्लेख, गुणरत्न सदावर्ते कडाडले
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान; वॉटर सलामी, टाळ्या अन् आनंदी जल्लोष
Australia vs India 4th Test : तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
तीन रिव्ह्यू फेल गेले, विकेट घेतली तो सुद्धा बुमराहचा नो बाॅल झाला! त्या 110 बाॅलमुळे टीम इंडियाच्या तोंडचा घास हिरावला?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
Embed widget