(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : शिवसेनेच्या दोन आमदारांना भाजपकडून मारहाण, किडनॅप करुन गुजरातला नेलं: संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेली ही पक्षशिस्त म्हणून करण्यात आली आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या आमदारांना भाजपने किडनॅप करुन गुजरातला नेल आणि दोन आमदारांना मारहाण केली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईडी, सीबीआयने आपल्यावरही दवाब आणला, पण आपण कधीही पक्ष सोडलो नाही असंही ते म्हणाले.
भाजपने आमदारांना मारहाण केली
एकनाथ शिंदे यांच्या बंडावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे बंड करण्यामागे एकनाथ शिंदे यांचा काही नाईलाज असू शकतो, तो मला माहिती आहे. ईडी आणि सीबीआयची नोटीस आम्हालाही आली आहे, पण आम्ही पक्ष सोडला नाही. मी माझ्या पक्षासोबत कधीही गद्दारी केली नाही. पण काही लोक दबावात आले आहेत. आमदार नितीन देशमुख यांना काल भाजपच्या लोकांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच आणखी एका आमदारालाही मारहाण करण्यात आली.
पक्षशिस्त म्हणून शिंदे यांच्यावर कारवाई
एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईचे समर्थन संजय राऊत यांनी केलं. पक्षशिस्त म्हणून ही कारवाई आवश्यक असल्याचं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. या दोघांवर एकनाथ शिंदे यांचे मन वळवून पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी आहे. तसं जरी नाही घडलं तरी इतर समर्थक आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न हे नेते करणार असल्याची माहिती आहे.