एक्स्प्लोर

Jayprakash Chhajed : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन

Nashik News : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे निधन झालं आहे.

Nashik News : नाशिकच्या (Nashik News) राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात एक दुःखद घटना घडली असून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटर्कचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड (Jayprakash Chaged) यांचे काल उशिरा निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. तरीदेखील नागपूर (Nagpur) येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने त्यांनी जाण्यास टाळले. दरम्यान काल त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली. तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची गोल्फ क्लब मैदानावर छाजेड यांच्या पुढाकारातून सभा झाली होती.

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती. नाशिकचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रितीश, हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. दरम्यान आज नाशिकच्या काँग्रेस भवन त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहेत

छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने नाशिकच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून इंटक संघटनेचा आवाज हरपला आहे. अशा शब्दात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाशी अतिशय निष्ठावान असलेल्या छाजेड यांना स्व.विलासराव देशमुख यांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी दिली. या काळात त्यांनी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवर अनेक संघटनात्मक पदे त्यांनी भूषविली. इंटक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने इटक संघटना कायमची पोरकी झाली असून लढवय्या कामगार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget