एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nandurbar News : नंदुरबारच्या शेतकऱ्यांचा मजूर टंचाईवर रामबाण उपाय, टोचन मशीनद्वारे एका दिवसात पाच एकरवर लागवड 

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी टोचन मशीनच्या साह्याने दिवसभरात पाच एकर कापसाचे लागवड करता येत आहे.

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar district) बागायतदार शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कापूस लागवडीची (Cotton Sowing) लगबग सुरु झाली असली तरी मजुरांच्या कमतरतेमुळे कापूस लागवडीवर परिणाम होत आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी टोचन मशीनद्वारे कापूस लागवडीला प्राधान्य दिले असून एका मजुराच्या सहाय्याने दिवसभरात पाच एकर कापसाची लागवड करता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैशांची बचत होण्यास मदत होत आहे.  

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात यावर्षी एक लाख 40 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीची शक्यता आहे. मात्र मजूर टंचाईमुळे कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राचा (Krushi Vidnyan Kendra) मार्गदर्शनाखाली हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राचा सहाय्याने कापूस लागवड सुरु केली असून यातून कमी बियाण्यात आणि समान अंतरावर कापसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाई दिलासा मिळाला आहे. यामुळे मजुरीचा खर्च तसेच बियाण्याचाही खर्च वाचण्यास मदत होत आहे. जमिनीत योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर लागवड होत असल्याने उगवण क्षमता ही चांगले असल्याचे दिसून आले आहे.
 
यावर शेतकरी लालसिंग राजपूत पाच एकर कापूस लागवडीसाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज भासत होती. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपयापर्यंत मजुरी मजुरांना द्यावी लागत होती. तसेच कापसाचे बियाणेही जास्त लागायचे आणि कापसाच्या दोन झाडातील अंतर कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही होत होता. मात्र या मशीनच्या सहाय्याने कापूस लागवड केल्यास मजुरीच्या पैशात आणि बियाण्याच्या पैशातही बचत होत असल्याचे शेतकरी सांगतात. जर लागवडीचा खर्चाचा अंदाज पाहिला तर दहा मजुरांचा मजुरीचा खर्च वाचून एकच मनुष्य कापूस लागवडीचे काम करु शकतो. एकाच वेळेस एक बी योग्य अंतरावर जात असल्याने योग्य खोलीवर असल्याने उगवण क्षमता चांगली आहे. कापसाचे झाडाचे अंतर समान राहत असल्याने उत्पादनासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे मजुरी आणि बियाण्याच्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.

मशीन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीनद्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी या मशीनचा उपयोग केला असून यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापसाची लागवड पूर्ण होत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात विविध कंपनीद्वारे मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होते. मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास मजूर टंचाईसारख्या समस्येवर शेतकऱ्यांना मात करुन श्रम आणि पैशांची बचत करता येते हे मात्र निश्चित असल्याचे समोर आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget