Job Majha : संधी नोकरीची! कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर येथे विविध पदांसाठी भरती
Job Mjha : : कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे.
Job Mjha : कृषी विज्ञान केंद्र अहमदनगर आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. कृषी विज्ञान केंद्र अमहदनर येथील भरतीसाठी दहावी पास विद्यार्थी देखील अर्ज करू शकात. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.
कृषी विज्ञान केंद्र, अहमदनगर
पोस्ट : शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ज्ञ.. यात कृषी विस्तार, उत्पादन आणि गृहशास्त्र असे 3 विभाग आहेत. तसंच ट्रॅक्टर चालक हवेत.
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी, अनुभव आणि ट्रॅक्टर चालकसाठी 10वी पास, वाहन चालवण्याचा परवाना आणि ITI आयटीआय असल्यास प्राधान्य दिलं जाईल.
एकूण जागा : 05 (यात प्रत्येक विभागासाठी 1 जागा आहे.)
वयोमर्यादा 27 ते 74 वर्ष
नोकरीचं ठिकाण : अहमदनगर
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.kvk.pravara.com
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर
विविध पदांच्या 50 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट : थिमॅटिक तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता : M.Sc., B.E.(सिव्हिल) आणि B.E. (यांत्रिक), 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत
मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in
पोस्ट : ज्युनियर RS आणि GIS असोसिएट
शैक्षणिक पात्रता : पृथ्वी विज्ञानमध्ये मास्टर्स किंवा मास्टर इन जिओ- माहितीशास्त्र सह भूविज्ञानमध्ये B.Sc., 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 06
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत
मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in
पोस्ट : सिनियर RS आणि GIS सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / M.Tech, 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा : 06
आणखीनही रिक्त जागांसंदर्भातली माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळू शकेल.
वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचं ठिकाण : MRSAC Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440010.
मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट : www.mrsac.gov.in