(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar Water issue: नंदुरबार जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनी गाठला तळ
Nandurbar Water issue: नंदुरबार जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनी गाठला तळ नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना आणि शेतीच्या सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठ्याने तळ गाठला असून जिल्ह्यातील सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. तसेच धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शेतातील विहिरींची ही पाणी पातळी खालावली आहे. ग्रामीण भागात येत्या काळात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन झाल्यावर दमदार पाऊस झाला तर ग्रामीण भागातील पाणी टंचाईमध्ये नागरिकांना काही दिलासा मिळेल मात्र मान्सून लांबणीवर पडला तर अडचणीत भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.