MNS President Raj Thackeray LIVE : उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा हल्लाबोल
MNS President Raj Thackeray melava LIVE Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर धडाडणार आहे. गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
LIVE

Background
उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray : स्वत:च्या स्वार्थासाठी कोणाचाही हात हातात घेऊन मागे जाऊन बसणाऱ्यांपैकी मी नाही. प्रकृतीचे कारण सांगून घरात बणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत जादूची कांडी फिरवली. आजा राज्यभर फिरत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एक तरी केस आहे का? असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय.
मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार : राज ठाकरे
Raj Thackeray : मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरूय; राज ठाकरेंचा टोला
अजूनही वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरू आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
घरात बसलेला माणून एक नंबरचा मुख्यमंत्री कसा? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
"उद्धव ठाकरे यांच्या एका गोष्ठीसाठी मी नतमस्तक होतो. कारण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की ते घरातून बाहेर न पडता देशातील मुख्यमंत्री झाले. चार संस्थांनी सर्व्हे केला. त्या संस्थेचं नाव कधी तुम्ही ऐकलं का? त्यामुळं घरात बसलेला माणून एक नंबरचा मुख्यमंत्री कसा? असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.
तुमच्या खोके, गद्दार याने आम्हाला काय करायच? संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला
मुंबई महापालिकेत जे 25 वर्ष सत्तेत असतील ते केलेल्या कामाचं सांगतील. मात्र ते कामाचं न सांगता गद्दार, खोके आणि पाठात खंजीर खुपसला हे वारंवार सांगत आहेत. परंतु, आम्हाला त्याचं काय करायचं आहे, अशा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
