Maharashtra Din : महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
Maharashtra Din : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो.
Maharashtra Din : 1 मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 106 जणांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.
1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर शेकडो राज्ये एकवटली गेली आणि देशाच्या कारभारासाठी राज्य व्यवस्था स्थापन करावी लागली. 1956 मध्ये राज्य पुनर्गठन अधिनियमाने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या मर्यादा निश्चित केल्या.
महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये 25 एप्रिल 1960 रोजी संसदेतर्फे लागू करण्यात आलेल्या बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार अस्तित्त्वात आली. त्यानंतर 1 मे 1960 रोजी हा कायदा अंमलात आला. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात विभागले गेले आणि दोन्ही स्वतंत्र राज्ये झाली. त्यामुळेच 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो.
106 आंदोलकांचं हौतात्म्य
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठिण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.
महत्वाच्या बातम्या