Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 25 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 28 हजार 286 नव्या रुग्णांची भर पडली असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 941 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2845 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 36 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.09 टक्के आहे. सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत आज 1 हजार 857 नवे कोरोनाबाधित
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 1 हजार 857 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 546 झाली आहे. तर मागील 24 तासांत 503 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील 27 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 857 रुग्णांपैकी 234 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 742 बेड्सपैकी केवळ 3 हजार 855 बेड वापरात आहेत.
अमरावती जिल्ह्यात आज 340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
अमरावती जिल्ह्यात आज 340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज 1815 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत आज 1815 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 753 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 22184 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भंडारा जिल्ह्यात 618 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 248 रुग्ण कोरोनामुक्त
भंडारा जिल्ह्यात 618 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 248 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
चंद्रपूरमध्ये आज 308 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
चंद्रपूरमध्ये आज 308 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चंद्रपूरमध्ये 3882 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.