एक्स्प्लोर
Akola News : अकोल्याच्या बालसुधारगृहातून सात मुली पळाल्या, दोघींचा शोध तर पाच अजूनही बेपत्ता
Akola News : अकोल्याच्या गायत्री बालसुधारगृहात अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील सात अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते.

खदान पोलीस स्टेशन अकोला
अकोला : अकोला शहरातील तुकाराम चौक परिसरात असलेल्या गायत्री बालसुधारगृहातून सात मुली पळून गेल्याची बाब आज शनिवारी पहाटे उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांत स्टेशन मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे. दुपारपर्यंत यातील दोन मुलींचा शोध लागला आहे. दरम्यान, या बालसुधारगृहातील मुले पळून जाण्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
नेमक्या कशा पळाल्यात मुली?
अकोल्याच्या गायत्री बालसुधारगृहात अनेक अल्पवयीन मुली आहेत. अपहरण प्रकरणातील सात अल्पवयीन मुलींना एकाच खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी आज शनिवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास रुमची लोखंडी ग्रील असलेली खिडकी तोडून बाहेर उड्या घेतल्यात. अन् या सातही जणी बालसुधारगृहातून पळून गेल्यात. पहाटे 'योगा'चा वेळ झाला, येथील महिला कर्मचारी त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेली. मात्र, रूमचा दरवाजा आतमधून बंद असल्याने, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर बऱ्याच वेळेनंतर खोलीची खिडकी तुटल्याचं निदर्शनास आले. यानंतर खोलीचा दरवाजा दरवाजा तोडण्यात आला आणि मुली पळवून गेल्याच समजले. यासंदर्भात लगेच कर्मचाऱ्यांनी खदान पोलिस स्टेशन गाठून आपल्या बालसुधारगृहातील सात मुली पळून गेल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी शोधल्यात दोन मुली, पाच अद्याप बेपत्ता :
दरम्यान, बेपत्ता मुलींचा शोध खदान पोलिसांनी सुरू केला. अन् दुपारपर्यंत यातील दोन मुलींचा शोध लागला आहे. पळून गेलेल्या सात मुलींपैकी पाच मुली अकोला जिल्ह्यातील तर दोन मुली बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे समजते. सापडलेल्या दोन मुलींना बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गायत्री बालसुधारगृहातून अनेकदा मुले पळून जाण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळ येथील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
संबंधित बातम्या :
महाराष्ट्र दिनी अनेकांना स्वाभिमानाचा झटका द्यावा लागणार, संजय राऊतांचा विरोधकांना इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
अमरावती
चंद्रपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
