Loudspeaker Row: 'लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरेंचे वक्तव्य संविधान विरोधी, कोणीही दादागिरी करू शकत नाही': रामदास आठवले
NMC Advise to Students: नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेण्याचा सल्ला दिला आहे.
Loudspeaker Row: लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सरकारला 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
मशिदींमध्ये कोणीही दादागिरी करू शकत नाही: आठवले
माध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, ''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाका, नाहीतर हनुमान चालिसाचे पठण करू, अशी घोषणा केली आहे. ठाकरेंच्या भूमिकेला आमचा विरोध आहे.'' रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आठवले म्हणाले की, मशिदींमध्ये कोणीही दादागिरी करू शकत नाही. तसेच धार्मिक स्थळे पाहणाऱ्यांनी आवाजाची मर्यादा ठरवावी. त्यांना पोलिसांना माहिती द्यावी लागेल, असे ते म्हणले आहेत.
'राज ठाकरेंचे वक्तव्य संविधान विरोधी'
आठवले म्हणाले, "रिपब्लिकन पक्षाचा अजान बंद करण्यास. तसेच मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्यास आणि मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यास विरोध आहे. रिपब्लिकन पक्ष हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थन करतो.” ते म्हणाले की, समस्या निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ठाकरे यांचे वक्तव्य राज्यघटनेच्या विरोधात असल्याचे सांगत ते म्हणाले की, त्यांचा पक्ष मनसेच्या भूमिकेला विरोध करतो. मात्र, याआधीही आठवलेंनी या मुद्द्यावरून राज ठाकरेंना विरोध केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : बहुचर्चित सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल, मनसैनिकांकडून जंगी स्वागत
Raj Thackeray: पुरोहितांचे आशीर्वाद घेउन राज ठाकरे रवाना, अमित ठाकरेंकडून देवीचं दर्शन ABP Majha