कोरोनाच्या परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाची मद्य पार्टी!
कोरोना सारखी भयानक परिस्थिती असताना बार्शीतल्या वैराग ग्रामपंचायतीत मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत कार्यलयात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाने मद्य पार्टी केली.

सोलापूर : जिल्ह्यात कोरोनाच विळखा दिवसेंदिवस वाढतोय. सोलापूर शहरात सर्वाधिक रुग्ण असले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण आढळत आहेत. अक्कलकोट, सांगोला, अकलूज, मोहोळ आणि बार्शी इत्यादी तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर काही दिवसांपूर्वी बार्शीतल्या वैराग तालुक्यातील एका किराणा दुकानदाराचे कोरोना अहवाल पुण्यात गेल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे वैराग तालुक्यातील संपर्कात असलेल्या लोकांची तपासणी सुरु आहे. सोबत वैराग परिसरातील काही भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अशाप्रकारची चिंताजनक परिस्थिती असताना शासकीय अधिकारी मात्र चक्क मद्य पार्टी करताना रंगेहात सापडले आहेत.
काल गुरुवारी वैराग ग्रामपंचायत कार्यालयात मद्य पार्टी रंगली होती. ग्रामपंचायत प्रशासनातील वैरागचे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर आणि त्यांचे इतर 3 सहकारी मद्य पार्टी करत होते. हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी कार्यालय गाठलं. त्यावेळी कार्यालयात पार्टी करणाऱ्या चौघांना त्यांनी रंगेहाथ पकडलं. हा सगळा प्रकार उपस्थितांनी मोबाईल कॅमेरात टिपला. या पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान या प्रकरणाची पोलिसांना तात्काळ दखल घेतली. शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच जिल्ह्यात दारूबंधी असताना शासकीय आस्थापनेत मद्य प्राशन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 269, 270, 188 सहकलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 55 आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85 (1) प्रमाणे या चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यल आला आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली. प्रकरणी वैराग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या फियार्दीवरुन वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांसाठीही रुग्णालयात दिरंगाई, सोलापूर मनपा उपायुक्तांकडून कारवाईचे आदेश
एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. सोलापुरात ही जिल्हा प्रशासन कोरोनाचे थैमान रोखण्याचे कसोशिने प्रयत्न करत आहे. मात्र स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि शासकीय कमर्चारीच असे गैरकृत्य करताना आढळल्याने जिल्ह्याभरात खळबळ माजली आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि जिल्ह्यात दारुबंदी असताना या कर्मचाऱ्यांना दारु मिळालीच कशी असा प्रश्न या निमित्ताने होत आहे. या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी केली.
Coronavirus | औरंगाबाद, सोलापूर, रत्नागिरी, अमरावतीतील कोरोनाबाधितांचा आकडा एका क्लिकवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

