एक्स्प्लोर

नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांसाठीही रुग्णालयात दिरंगाई, सोलापूर मनपा उपायुक्तांकडून कारवाईचे आदेश

सोलापुरात नॉन कोविड रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात आजारी ग्रस्त असलेल्या या रुग्णांवर तात्काळ उपचार न केल्याने त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं.

सोलापूर : एकीकडे सोलापुरात कोरोनाबाधितांची आकडे रोज वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना नसलेल्या रुग्णांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात असाच काहीसा अनुभव रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आला. आजाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णांवर तात्काळ उपचार न केल्याने त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं. या सहकारी रुग्णालयात रुग्णांना दाखल न करुन घेता त्यांना बाहेरच ठेवण्यात आलं. यावेळी रुग्ण हॉस्पिटलच्या परिसरात जमिनीवर झोपून होते.

ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच महापालिका उपायुक्त पंकज जावळे हे तात्काळ संबंधित रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली कैफियत उपायुक्तांसमोर मांडली. काही रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेले असताना देखील रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतले नाही, असा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईंकानी आपली वेदना व्यक्त केली. उपायुक्त पंकज जावळे यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे उपायुक्तांनी तात्काळ याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.

सोलापुरात कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शासकीय रुग्णालया व्यतिरिक्त इतर कुठेही उपचार मिळत नसल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील 28 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एका रुग्णालयाने या बाबत खुलासा न केल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. सोबतच सोलापुरात रुग्णालय सुरु आहेत का किंवा ते नागरिकांना व्यवस्थित सेवा देत आहेत का हे तपासण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काडून सर्व रुग्णांवर उपचार करण्यास सांगितले आहे. मात्र तरी देखील या रुग्णालयाकडून त्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत होती.

नागरिकांकडून दोन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपायुक्त आणि प्रशासकीय अधिकारी या रुग्णालयात दाखल झाले. संबधित रुग्णांच्या नातेवाईकांशी बातचीत करुन अधिकचे तपशील जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे उपायुक्त पंकज जावळे यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयांना रुग्णांना वैद्यकीय सेवा योग्य पद्धतीने आणि वेळेत पुरवण्याची विनंती देखील केली.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Devendra Fadnavis and Sharad Pawar: 5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'
5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'
Rohit Pawar Pune: चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप
चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेवर आवाज उठवणाऱ्यांना उद्योग मंत्र्यांकडून धमकीचे फोन; उद्योजकांच्या भेटीसाठी गेलेल्या रोहित पवारांचा मोठा आरोप

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget