एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका? अर्थखात्याकडून विविध विभागाच्या खर्चाला कात्री

Ladki Bahin Yojana : एकूण वार्षिक तरतुदीच्या 70 टक्के निधीच खर्च करण्याच्या सूचना अर्थखात्याने राज्यातीलव विविध विभागांना दिल्या आहेत. 

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फटका राज्यातील इतर योजनांना बसतोय की काय असं चित्र आहे. त्याला कारण म्हणजे अर्थखात्याने विविध खात्यांना दिलेल्या सूचना. एकूण वार्षिक तरतुदीच्या 70 टक्केच निधी खर्च करण्यात यावा अशा सूचना अर्थखात्याने दिल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचा सन 2024-25 सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थखात्याकडून राज्यातील विविध विभागांना किती निधी खर्च करण्यात यावा संदर्भात अनुमान घालून देण्यात आलं. या 70 टक्क्यांपैकी निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन, सहायक अनुदानित वेतन, कर्ज रक्कम, कर्जाची परतफेड आणि अंतरलेखा हस्तांतरे या विभागांना 100 टक्के निधी हा खर्च करता येणार आहे. 

बक्षीसे, विदेश प्रवास खर्च, प्रकाशने, संगणक खर्च, इतर प्रशासकीय खर्च, जनहितार्थ खर्च, लहान बांधकामे, सहाययक अनुदाने, ननर्षमतीकरीता अनुदान, मोटार वाहने, यंत्रसामग्री, मोठी बांधकामे, गुंतवणुका या साठी जर निधी लागणार असेल तर 18 फेब्रुवारी पर्यंत निवेदन सादर करण्यात यावे अशी सूचना अर्थखात्याकडून करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांना?

लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं जाणारं अनुदान गेल्या वर्षभरापासून मिळालेलेच नाही. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची शासनाकडे पाच कोटी 60 लाख रुपये सरकारकडे बाकी आहे. 

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान मिळते. शेतीत ठिबक योजनेसाठी स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांनी पैसे घातले. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे मागण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवतात. मात्र त्यांना त्यांच्या हक्काचे सबसिडीचे पैसे मिळत नसल्याची स्थिती उद्भवली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शिवभोजन थाळी सारख्या योजना बंद करायला लागल्याचा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. तर लाडकी बहीण योजना बहिणींसाठी नाही तर सत्तेसाठी होती, असे म्हणत माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांच्या नावाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
Embed widget