Holi 2023 Festival LIVE Updates: राज्यात होळीचा उत्साह; जाणून घ्या प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स
Holi 2023 Festival LIVE Updates: देशासह राज्याच आज सर्वत्र होळीचा उत्साह आहे. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स..
LIVE

Background
Kolhapur News: धुलीवंदनानिमित्त कोल्हापूरकरांचा मांसाहारावर ताव, मटण, मासे आणि चिकन घेण्यासाठी नागरिकांची तुंबड गर्दी.
Kolhapur News: धुलीवंदनचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो...धुलीवंदन म्हणजेच कोल्हापुरी भाषेत धुलवड आणि मांसाहार यांचं समीकरण ठरलेलं असतं.. आणि म्हणूनच कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नागरिकांची खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहेत...मटण घेण्याबरोबरच फिश आणि चिकन घेण्यासाठी देखील नागरिक सकाळपासूनच गर्दी करत आहेत.... कोल्हापूरकर आणि मांसाहाराचं नातं नव्याने सांगायला नको म्हणूनच आज प्रत्येक घराघरात खुळा रस्ता करत धुलवड साजरी केली जाणार आहे
Jalna News: धुलीवंदनाच्या दिवशी प्रतिकात्मक हत्तीवरून बसून राजाकडून रेवड्या वाटप.
Jalna News: जालना येथे धुलीवंदनाच्या निमित्ताने 134 वर्षांची परंपरा असलेली 'हत्ती रिसाला' मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रतिकात्मक लोखंडी हत्तीची बैलगाडी मध्ये मिरवणूक काढली जाते. या हत्तीवर वंश परंपरेने एका व्यक्तीला राजा म्हणून बसवले जाते. हा राजा याच हत्तीवर बसून लोकांना रेवड्या वाटतो. दरम्यान ही मिरवणूक ज्या भागातून जाते त्या ठिकाणी रंग खेळणे बंद करण्यात येत. गेल्या 134 वर्षांपासून हा संकेत पाळला जातो. निझाम राजवटीपासून ही प्रथा रूढ झाल्याचा इतिहास सांगितला जातो.
Mumbai Holi: भाजप नेेते कृपाशंकर सिंह यांच्या होळी कार्यक्रमात मनोज तिवारींची उपस्थिती
Mumbai Holi: भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी सन अँड सन्स या जुहू चौपाटी परिसरात असणाऱ्या होटेल मध्ये होळीच आयोजन करण्यात आले. होळी कार्यक्रमात, मनोज तिवारींनी हजेरी लावली. होळीनिमित्त गीत गायन करुन उपस्थितांची दाद लुटली.
Juhu Holi: मुंबईच्या जुहु चौपाटीवर धुळवड साजरी करण्यासाठी तरुणांची गर्दी
Juhu Holi: होळीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा होताना पाहायला मिळत आहे. मागील दोन-तीन वर्षात कोरोना निर्बंधामुळे होळी साजरी करता आली नव्हती. माञ यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत त्यामुळे जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात होळी साजरी करणाऱ्यांची संख्या पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात तरुण अनेक कुटुंब जुहू चौपाटीला होळी साजरी करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड केली साजरी
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. सहकुटुंब आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
