एक्स्प्लोर
Advertisement
अपघातावेळी हेल्मेट नसल्याने जीव गमावला, मित्रांची हेल्मेट वाटून श्रद्धांजली
किरणच्या सात ते आठ मित्रांनी 2 जुलै या किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला.
सांगली : दुचाकीवरुन जाताना झालेल्या अपघातात केवळ हेल्मेट नसल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मित्रांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. मित्राच्या वाढदिवशी हेल्मेट वाटप करण्याचा अनोखा कार्यक्रम सांगलीत मित्रांनी पार पाडला आहे. सांगलीतील पुष्प राजचौकात हेल्मेट वाटप कार्यक्रम पार पडला.
किरण रामचंद्र येडगे या 23 वर्षीय तरुणाचा 28 मे रोजी सांगलीवाडीमधील घरी जात असताना अपघात झाला होता. यावेळी किरणने हेल्मेट घातलं नव्हतं. मित्रांची भेट घेऊन घरी निघालेल्या किरणच्या अपघाताची बातमी त्याच्या मित्रांना तासाभरातच कळाली आणि त्यांनाही मोठा धक्का बसला. या अपघातात किरणच्या फक्त डोक्याला मार लागला होता आणि त्यातच किरणचा मृत्यू झाला होता.
डोकं सोडून किरणच्या अंगाला साधं खरचटलंही नव्हतं. जर त्यादिवशी किरणच्या डोक्यावर हेल्मेट असतं तर किरणचा जीव वाचला असता अशी भावना त्यावेळी किरणच्या आई-वडील आणि मित्रांनी व्यक्त केली होती. केवळ हेल्मेट नसल्याने मित्राचा झालेला मृत्यू किरणच्या मित्रांच्या मनाला चटका लावून गेली होती. त्यामुळे किरणच्या सात ते आठ मित्रांनी 2 जुलै या किरणच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला.
जी वेळ किरणवर आली तशी वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये म्हणून नागरिकांमध्ये हेल्मेटविषयी प्रबोधन व्हावं म्हणून किरणच्या वाढदिवशी आम्ही हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला असं किरणचे मित्र सांगतात. किरणच्या मित्रांच्या या उपक्रमाला सांगली वाहतूक शाखेनेही पाठिंबा दिला. किरणच्या आई-वडिलांच्या हस्तेच या हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी किरणच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement