एक्स्प्लोर
घडलं बिघडलं | 2018 या वर्षात नाशिकमध्ये घडलेल्या 10 महत्त्वाच्या घटना
नाशिकमध्ये 2018 वर्षाची सुरुवात चांगली झाली. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती झाली. त्यानंतर किसान सभेचे लाल वादळ नाशिकहून मुंबईला निघाले, मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसने कात टाकली, अशाच 2018 या वर्षात घडलेल्या 10 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या आयुक्तपदी धडाकेबाज अधिकरी तुकाराम मुढेंची नियुक्ती झाली आणि नाशिकला अच्छे दिनांचे स्वप्न पडू लागले. मात्र नाशिककरांचा हा आनंद फार काळ टिकाला नाही. सत्ताधाऱ्यांशी वाद झाल्याने अवघ्या 10 महिन्यांत मुंढेची बदली करण्यात आली
2. किसान सभेचे धडकी भरवणारे लाल वादळ नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले. वनहक्क जमिनीसह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला मुंबईत विशाल रुप मिळाली, अखेर सरकारकडून या लाल वादळाची दखल घेतली गेली आणि मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आलं.
3. नाशिककरांचा जीव की प्राण असलेल्य़ा मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसने कात टाकली, बोग्यांना आकर्षक रंग, एक्स्प्रेसमध्ये नावीन्यपूर्ण आसनव्यवस्था, मोबाईलसाठी चार्जिंगची व्यवस्था अशा सुविधांनी पंचवटी एक्स्प्रेसचा चेहरामोहरा बदलला. यासाठी रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी यांनी खूप प्रयत्न केले. परंतु पंचवटी एक्स्प्रेस नाशिकमध्ये येण्याआधी त्यांना मृत्यूने गाठलं.
4. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी 10 जूनला नाशिकमध्ये आले होते. आंबा खाल्याने मुलं होतात असे वक्तव्य त्यांनी केले आणि राज्यात वादंग माजला. या प्रकरणी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यात आला, अखेर जमिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली.
5. जागतिक योग दिनानिमित्त नाशिकच्या ,शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. योगाचार्य विश्वास मंडलिक यांचा केद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान पुरस्काराने गौरव करण्यात आला. गेल्या 55 वर्षांपासून डॉ. विश्वास मंडलिक योगाभ्यासाचा तंत्रशुद्ध पद्धतीने प्रसार आणि प्रचार करत आहेत.
6. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या छगन भुजबळ, आणि समीर भुजबळांना 3 वर्षांनंतर जामीन मिळाला. कारागृहातून मुक्तता होताच मुंबईच्या बाहेर भुजबळांचं आपल्या होमपिचवर पहिले पाऊल पडले. समर्थकांकडूनही जोरदार स्वागत करण्यात आले
7. राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर फर्निक्युलर ट्रॉलीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी भाविक अवघ्या दीड मिनिटात गाभाऱ्यात पोहोचू लागले
8. नाशिककरांचं हवाई प्रवासाचे स्वप्न फार काळ टिकले नाही. नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे विमानसेवेला अवघ्या काही महिन्यांत ब्रेक लागला. नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही एअर डेक्कन कंपनी सेवा देण्यात अपयशी ठरली.
9. नाशिक जिल्हात साथीच्या रोगांचे थैमान. स्वाईन फ्लूमुळे वर्षभरात तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद नाशिकमध्ये झाली
10. वर्षाअखेरीस नाशिककरांना हुडहुडी भरली. निफाडचा पारा तब्बल 1.8 अंशावर घसरला. हाडं गोठवणाऱ्या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले नाशिकच्या दिशेने वळली.पर्यटकांमुळे नाशिकच्या उत्पन्नात वाढ झाली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
