एक्स्प्लोर
वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्न मर्यादा आठ लाखांवर
या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आणखी सोपं होणार आहे. अगोदर ही मर्यादा 6 लाख रुपये होती, त्यामध्ये वाढ करुन ती आठ लाख रुपये करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

मुंबई : डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आणखी सोपं होणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाअभावी शिक्षण घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठीची कुटुंब उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये होती, त्यामध्ये वाढ करुन ती आठ लाख रुपये करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून, चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांची कमाल संख्या 500 कायम ठेवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
