एक्स्प्लोर

Dr. Babasaheb Ambedkar : भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना! बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर उसळला

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो.

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( (Dr Babasaheb Ambedkar)) यांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमीवर (Chaityabhumi) जनसागर उसळला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो नागरिकांची गर्दी उसळली होती. 

भारतातील वर्ग लढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.  स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.  बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. 

जातीव्यवस्थेने अस्पृश्य समाजाला दिलेल्या गुलामीच्या बेड्या तोडताना समाज परिवर्तनासोबत सशक्त भारताच्या निर्मितीसाठी दिशा दाखवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. बाबासाहेबांनी केलेल्या उत्तुंग कार्याने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रगतीचा, समान संधीचा मार्ग मोकळा केला. त्याची आठवण ठेवून महापरिनिर्वाण दिनी लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर उसळतो. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक पुढील वर्षी तयार होणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.   

विद्रोही, आंबेडकरी गीतांचा जागर ते पुस्तक खरेदीसाठी गर्दी

आंबेडकरी, विद्रोही गीतांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यात आले. काही शाहिरी कलापथकांकडून आंबेडकरी, विद्रोही गीते सादर करण्यात आली. तर, गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रतिमा घेण्यासाठीदेखील लोकांची गर्दी दिसून आली. त्याशिवाय, छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आणि परिसरात असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी दिसली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री होत असल्याने त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. शासन आणि इतर प्रकाशकांच्या स्टॉलवर लोकांची गर्दी दिसून आली. 

चैत्यभूमी परिसरात व्यवस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, मुंबई महापालिकेसह इतर अनेक संस्था संघटनांच्यावतीने चैत्यभूमीवर अनुयायांसाठी विविध व्यवस्था केली होती. तर, रेल्वेने अतिरिक्त वाहतूक सोडण्यात आली होती. तर, बेस्ट प्रशासनानेदेखील बसेस सोडल्या होत्या. तर, विविध संस्था, संघटनांच्यावतीने अनुयायांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget