(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagar Panchayat Elections 2022 : नगरपंचायत निवडणुकीत मराठवाड्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष
Nagar Panchayat Elections 2022 : निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकालांच्या आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने मराठवाड्यात आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे.
मुंबई : ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंनिवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 106 नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकालांच्या आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने मराठवाड्यात आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे. भाजपने 102 ,शिवसेना 74, राष्ट्रवादी 94,काँग्रेस 80 आणि इतर 41 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या तीन्ही पक्षांना मागे टाकत भाजपने मराठवाड्यात आपलं पहिलं स्थान मिळवलं आहे.
कोणत्या जिल्ह्यात कुणाला किती जागा?
औरंगाबाद
- शिवसेना : 11
- भाजप : 06
जालना
- राष्ट्रवादी : 34
- शिवसेना : 22
- भाजप : 14
- काँग्रेस : 09
- इतर : 06
बीड :
- भाजप : 47
- शिवसेना : 02
- राष्ट्रवादी : 21
- काँग्रेस : 05
- इतर : 10
उस्मानाबाद
- भाजप : 10
- शिवसेना : 16
- राष्ट्रवादी : 02
- काँग्रेस : 04
- इतर : 03
लातूर
- भाजप : 14
- शिवसेना : 06
- राष्ट्रवादी : 14
- काँग्रेस : 23
- इतर : 11
नांदेड
- भाजप : 03
- शिवसेना : 03
- राष्ट्रवादी : 08
- काँग्रेस : 33
- इतर : 04
परभणी
- भाजप : 01
- शिवसेना : 00
- राष्ट्रवादी : 10
- काँग्रेस : 00
- इतर : 06
हिंगोली
- भाजप : 07
- शिवसेना : 14
- राष्ट्रवादी : 05
- काँग्रेस : 06
- इतर : 02
मराठवाड्यात भाजपला 102 ,शिवसेना 74 ,राष्ट्रवादी 94,काँग्रेस 80 आणि अपक्षांना 41 जागा मिळाल्या आहेत.
हे देखील वाचा-