एक्स्प्लोर

Pune Crime News : तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना

Pune Crime News : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका डिलिव्हरी बॉयकडून तरुणीची छेड काढण्यात आली आहे.

Pune Crime News : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका डिलिव्हरी बॉयकडून तरुणीची छेड काढण्यात आली आहे. 'तू खूप सुंदर दिसतेस' म्हणत पोर्टर अँपच्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग (Pune Crime News) करण्या आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेरात कैद झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Pune Shivajinagar Police Station) डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर कांबळे असे या संशयित आरोपीचं नाव असून त्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.

Pune Crime News : डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली अन्...

मिळलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲपवरून सामान बोलवले होते. हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतलं. मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली. तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले. यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला खूप सुंदर दिसतेस, असं म्हटलं. दरम्यान 6 मार्चला संध्याकाळी पाच वाजता सुमारास हि घटना घडलीय. तरुणीच्या घरी ही घटना घडली आहे. यावेळी तरुणीच बाळ आणि सासू घरात होते. घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि त्यांनतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं.

Pune Shivajinagar Police Station: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

सध्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲपमधील सगळे डिटेल्स पोलिसांना देण्यात आले असून तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आता या संशयित आरोपीला अटक करणं हे पोलिसानंपुढचं आव्हान असणार आहे.

Accident News : औसा- तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा - तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडलीय. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती.

 इतर महत्वाच्या बातम्या

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime: 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती, यवतमाळच्या राळेगावमध्ये खळबळ
6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती, यवतमाळच्या राळेगावमध्ये खळबळ
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Embed widget