एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amravati Lok Sabha : वंचित बहुजन आघाडीला अमरावतीत मोठा धक्का! पक्षादेश धुडकावत थेट जिल्हाध्यक्षांनीच दिला काँग्रेसला पाठिंबा 

Amravati : अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षादेश धुडकावत मविआच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

Amravati Lok Sabha Election: अमरावतीत (Amravati) वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे  (Balwant Wankhade) यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे. आज अमरावती येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला अमरावतीत मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, वंचितचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष  ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

वंचितला अमरावतीत मोठा धक्का!

अमरावतीत वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांना पाठींबा जाहीर केला आहे. मात्र, रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान-सन्मान देत नाही. असे असतांना त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचारार्थ वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनाविरुद्ध काम करावे लागणार आहे. यामुळेच समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे.

मतदारसंघात चौरंगी लढत, नेमका कौल कोणाला?

या मतदारसंघात महायुतीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे प्रतिस्पर्धी असणार आहे. अशातच महायुतीचाच (Mahayuti) भाग असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी थेट आपला उमेदवार उतरवत भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या विरोधात शड्डू ठोकलाय. अमरावतीत प्रहारने दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे रिपब्लिन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. एकुणात या मतदारसंघात रंगतदार लढत होणार आहे. असे असताना वंचितमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका फटका कोणाला बसतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ, मात्र.... 

आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहोत. मात्र, अमरावती जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्ष हा वंचित पक्षातील कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षेप्रमाणे मान-सन्मान देत नाही. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या रणनीती मध्येही कुठलेही सहकार्य करत नाही. प्रामुख्याने या गोष्टी प्रकाश आंबेडकर यांना अंधारात ठेवून हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे एक सामान्य नागरिक म्हणून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आमची अशी भूमिका आहे की, या मतदारसंघातून निवडून येणारी जागा ही संविधान विरोधी आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी संभाव्य विजयी उमेदवाराला पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. असे न झाल्यास त्याचे सर्व खापर हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर फोडले जाणार आहे. त्यामुळे वंचितचा एक कार्यकर्ता आणि समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून विजय उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहणे हे महत्त्वाचे असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
महायुतीला खटाखट मतं मिळाली, मविआला प्रचंड मोठा धक्का; विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Embed widget