तुम्ही आम्हाला शिव्या द्या, भोकं पडणार नाहीत, पण एक दिवस आम्ही तुम्हाला नक्की बांबू लावू : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही तात्पुरती व्यवस्था आहे. लवकरच सरकार बदलणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
नागपूर : सत्ताधाऱ्यांना जेवढी चौकशी करायची आहे ती त्यांनी करावी, त्यांचं घटनाबाह्य सरकार आहे, त्यांना शिव्या द्यायच्या तर देऊ द्या, आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत आमच्यावर काय चौकशा लावायच्या त्या लावा, एक वेळ अशी येईल की आम्ही तुम्हाला बांबू लावू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. मागासवर्ग आयोगावर प्रचंड दबाव आहे. आठ दिवस झाले राजीनामा देऊन सरकार स्पष्टीकरण दिला नाही, असेही संजय म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, तुम्हाला एसआयटी स्थापन करायची तर करा, सीआयए, केजीबीला द्यायचे तर तिकडे द्या. खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची त्यासाठी हा कारखाना आहे. लाखो लोक शिवसेनेत आहे, त्यासाठी स्वतंत्र एसआयटी लावा. तपास यत्रणांचा तसा वापर करा आणि कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडा.सरकारं बदलणार आहेत. दबाव तंत्राला आम्ही भीक घालत नाही.सरकार 2024 नंतर बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही तात्पुरती व्यवस्था आहे. लवकरच सरकार बदलणार आहे.
नागपूर, ठाणे, पुणे या सगळ्या महानगरपालिकांचं ऑडिट करा : संजय राऊत
मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार, यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट करण्यापूर्वी गेल्या दोन वर्षांचं ऑडिट आधी करा. मात्र त्यापूर्वी नागपूर, ठाणे, पुणे या सगळ्या महानगरपालिकांचं ऑडिट करा. त्याचवेळी नगरविकास खात्याचंही ऑडिट करा, तिथे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.ऑडिटर नसतील तर आम्ही मदत करू.
मुख्यमंत्रीपदाचं अपॉइंटमेंट लेटर दिल्लीतून येतात : संजय राऊत
मोदींविषयी आमच्या मनात नेहमीच आदर आहे. जर एखादी व्यक्ती राजकीय भूमिका घेतो तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात.
देशााचे प्रधानमंत्री ही राजकीय संस्था आहे, व्यक्ती नाही. आम्हाला त्या पदाबद्दल आदर आहे, असेही राऊत म्हणाले. तीन राज्यांत कसं माहिती नाही पण भाजपनं बहुमत आणलं आहे. त्या राज्यात मुख्यमंत्री पदाचे अपॉइंटमेंट लेटर दिल्लीतून येतात, असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा :
'एकनाथ शिंदेकडून दाखल उत्तरावर शेवाळे उत्तर कसे देतील?' ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल; आमदार अपात्रता सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांत खडाजंगी